Infinix Hot 50 5G भारतात लाँच झाला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून मोबाईल आपली किंमत रेंज आणि दमदार फिचर्ससाठी चर्चेमध्ये होता. तसेच, आता हा ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी तयार आहे. याची सेल फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर सुरु होईल. स्मार्टफोनमध्ये एक्सटेंटेड टेक्नॉलॉजीच्या मदतीने 16 जीबी पर्यंत रॅम, 48MP AI कॅमेरा सेटअप, MediaTek Dimensity 6300 चिपसेट सारखी वैशिष्ट्ये आहेत. चला, पुढे इंफिनिक्स हॉट 50 5 जी ची किंमत आणि स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.
Infinix Hot 50 5G ची किंमत आणि उपलब्धता
- Infinix Hot 50 5G दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये भारतात लाँच झाला आहे.
- फोनच्या 4GB रॅम +128 जीबी स्टोरेजची किंमत 9,999 रुपये आहे.
- टॉप मॉडेल 8GB रॅम +128 जीबी स्टोरेज 10,999 रूपयांना आहे.
- ब्रँड यावर 1,000 रुपयांचा बँक ऑफर देत आहे.
- Hot 50 5G स्मार्टफोनची सेल 9 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरु होईल.
- हा स्लीक ब्लॅक, वाईब्रेंट ब्लू, सेज ग्रीन आणि ड्रीमी पर्पल सारख्या चार ऑप्शनमध्ये सादर झाला आहे.
Infinix Hot 50 5G चे स्पेसिफिकेशन
डिस्प्ले
Infinix Hot 50 5G मध्ये 6.7 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले मिळत आहे. या स्क्रीनवर ग्राहकांना 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट मिळतो. कंपनीचा दावा आहे की युजर्स मोबाईलमध्ये एप्लिकेशननुसार 60, 90 आणि 120Hz रिफ्रेश रेटचा अनुभव करू शकतील. या स्क्रीनवर 93.9 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो आणि पंच होल डिझाईन मिळेल.
चिपसेट
Infinix Hot 50 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी कंपनीने मीडियाटेक डायमेंसिटी 6300 चिपसेट दिली आहे. हा मोबाईल प्रोसेसर 2.4GHz पर्यंतची हाय क्लॉक स्पीड प्रदान करतो. ज्याच्या सोबत ग्राहकांना चांगली डाऊनलोडिंग स्पीड आणि गेम खेळण्याची क्षमता मिळते.
रॅम आणि स्टोरेज
स्पीड आणि डेटा स्टोर करण्यासाठी नवीन Infinix Hot 50 5G दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यात 4GB रॅम +128 जीबी स्टोरेज आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेजचा समावेश आहे. फोनमध्ये 8GB पर्यंत एक्सटेंडेड रॅम काला सपोर्ट पण आहे. ज्याच्या मदतीने एकूण 16GB पर्यंतचा पावर उपयोग केला जाऊ शकतो.
कॅमेरा
कॅमेरा फिचर्स पाहता Infinix Hot 50 5G ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. याच्या बॅक पॅनलवर युजर्सना एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी Sony IMX582 कॅमेरा लेन्स मिळतो. तसेच मध्ये एक AI लेन्स लावली आहे. फोनच्या कॅमेरा मध्ये युजर्सना 12 पेक्षा जास्त मोड मिळतील. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी आणि चार्जिंग
पावर बॅकअपसाठी ब्रँडने डिव्हाईसमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. ज्यामुळे तुमचा पूर्ण दिवसाचा बॅकअप सहज मिळू शकतो ही बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. यात ग्राहकांना AI चार्ज प्रोटेक्शन, पावर मैराथन, स्मार्ट मोड, अल्ट्रा पावर सेव्हिंग मोड सारखे फिचर्स पाहायला मिळतील.
इतर
Infinix Hot 50 5G मध्ये सुरक्षेसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक फिचर आणि अनेक AI टेक्नॉलॉजी असणारे फिचर देण्यात आले आहेत. यात कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम 5G, वाय-फाय, ब्लूटूथ मिळतो. तर डायनॅमिक बार इंटरअॅक्टिव्ह स्क्रीन पण खास आहे. Infinix HOT 50 5G मध्ये सेगमेंट-फर्स्ट TUV SUD A लेव्हल 60-महिन्याचा फ्लुएंसी एश्योरेंस मिळेल. जो 5 वर्षांपर्यंत चांगला परफॉरमेंस देतो.
ऑपरेटिंग सिस्टम
ऑपरेटिंग सिस्टम पाहता Infinix Hot 50 5G स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉईड 14 आधारित ब्रँडच्या XOS 14 वर चालतो.