स्वस्त फोन Realme 13 4G ग्लोबली झाला लाँच, यात आहे 16 जीबी पर्यंत रॅम, 50MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी

रियलमीने 13 प्रो सीरीजच्या भारतीय लाँचनंतर ग्लोबल बाजारात सामान्य 13 सीरीजची सुरुवात केली आहे. यानुसार Realme 13 4G डिव्हाईस इंडोनेशिया मध्ये लाँच झाला आहे. हा फोन कमी किंमतीत स्नॅपड्रॅगन 685 चिपसेट, 6.67 इंचाचा OLED डिस्प्ले, 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5000mAh बॅटरी सारखे अनेक जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह आहे. चला, पुढे किंमत आणि वैशिष्ट्यांची माहिती जाणून घेऊया.

Realme 13 4G चे स्पेसिफिकेशन

  • 6.67 इंचाचा OLED डिस्प्ले
  • स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसर
  • 8GB रॅम +256GB स्टोरेज
  • 50MP सोनी LYT-600 रिअर सेन्सर
  • 16MP फ्रंट कॅमेरा
  • 5,000mAh बॅटरी
  • 67W फास्ट चार्जिंग
  • IP64 रेटिंग

स्क्रीन: Realme 13 4G फोनमध्ये 6.67 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या पॅनलवर 120Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट, FHD+ रिजॉल्यूशन आणि 2,000 निट्स पर्यंत पीक ब्राईटनेस मिळते. डिव्हाईसमध्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे जो हार्ट रेट मॉनिटरच्या रूपामध्ये पण चालतो. हेच नाही ओला झाल्यावर उपयोगसाठी रेन वॉटर टच फिचर पण देण्यात आले आहे.

चिपसेट: फोनमध्ये चांगल्या अनुभवसाठी ब्रँडने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसर लावला आहे. हा 6nm प्रक्रियेवर चालतो. डिव्हाईसमध्ये गेमिंग आणि इतर ऑपरेशनसाठी जीटी मोड पण आहे.

स्टोरेज आणि रॅम: यात 8GB रॅम तसेच 8GB डायनॅमिक रॅमची सुविधा आहे ज्याच्या मदतीने 16 जीबी पर्यंतचा पावर उपयोग केला जाऊ शकतो. हा दोन स्टोरेज पर्याय 128GB आणि 256GB मध्ये येतो. मोबाईलमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट पण देण्यात आले आहे.

कॅमेरा: फोनमध्ये रिअर पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात सोनी LYT-600 सेन्सर आणि ऑप्टिकल फोटो स्टेबिलायजेशन टेक्नॉलॉजी असलेला 50MP चा मेन सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर लावला आहे. तसेच, फ्रंटला 16MP ची लेन्स आहे जी 30fps वर 1080p व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची क्षमता ठेवतो.

बॅटरी: Realme 13 4G मध्ये 67W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची मोठी बॅटरी आहे. ब्रँडचा दावा आहे की हा 19 मिनिटामध्ये 50% आणि 47 मिनिटामध्ये फुल चार्ज होतो.

इतर: फोनमध्ये ड्युअल सिम 4 जी, एनएफसी, ड्युअल-बँड वाय-फाय, स्टीरियो स्पिकर, 3.5 मिमी हेडफोन जॅक, पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP64 रेटिंग देण्यात आली आहे.

ऑपरेटिंग सिस्टम: Realme 13 मोबाईल लेटेस्ट अँड्रॉईड 14 आधारित Realme UI 5.0 वर चालतो.

Realme 13 4G ची किंमत आणि उपलब्धता

  • ग्लोबल वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार Realme 13 4G डिव्हाईस दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये येतो.
  • डिव्हाईसच्या 8GB रॅम+128 जीबी ऑप्शनची किंमत IDR 2,999,000 म्हणजे जवळपास 15,600 रुपये आहे.
  • टॉप मॉडेल 8 जीबी +256 जीबी पर्याय IDR 3,199,000 म्हणजे भारतीय किंमतीनुसार जवळपास 16,700 रुपयांना आहे.
  • Realme 13 4G स्कायलाईन ब्लू आणि पायनियर ग्रीन सारख्या दोन कलर मध्ये उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here