23 फेब्रुवारीला होईल MWC मध्ये Motorola चा ईवेंट, येऊ शकतो फ्लॅगशिप

दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मोबाईलचा महामेळावा भरणार आहे ज्याला मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस म्हटले जाते. MWC 2020 स्पेनच्या बार्सोलोना मध्ये आयोजित होईल जिथे जगभरातील टेक कंपन्या आपली नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन प्रोडक्ट् सादर करेल. OPPO, Vivo व Realmeसारख्या मोठ्या ब्रँड्सनी एमडब्ल्यूसी मध्ये आपल्या ईवेंटची घोषणा केली आहे. आता या यादीत अजून एक आले आहे Motorola. मोटोरोलाने सांगितले आहे कि कंपनी मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस मध्ये सहभाग घेणार घेऊन एमडब्ल्यूसी मध्ये 23 फेब्रुवारीला कंपनी आपला नवीन प्रोडक्ट लॉन्च केला जाईल.

Motorola ने MWC 2020 मध्ये आयोजित होणाऱ्या ईवेंटचे इन्वाईट पाठवायला सुरवात केली आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि येत्या 23 फेब्रुवारीला मोटोरोला मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस मध्ये सहभागी होऊन आपला नवीन प्रोडक्ट टेक मंचावर सादर करेल. मोटोरोलाने एमडब्ल्यूसी मध्ये कंपनी कोणता फोन आणेल याचा खुलासा केला नाही, पण आशा आहे कि हा एक फ्लॅगशिप फोन असेल. तसेच काही रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे कि मोटोरोला या ईवेंट मध्ये Motorola Z सीरीजचा एखादा फोन लॉन्च करू शकते.

Moto G8 / Moto G8 Power

रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हे दोन्ही स्मार्टफोन पंच होल डिस्प्ले सह येतील. Moto G8 6.39 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करेल तसेच Moto G8 Power मध्ये 6.36 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो. Moto G8 तीन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यात 2 जीबी रॅम, 3 जीबी रॅम आणि 4 जीबी रॅम असेल. तसेच फोन मध्ये 32 जीबी मेमरी आणि 64 जीबी की इंटरनल स्टोरेज मिळू शकते. Moto G8 Power फोन मध्ये 4 जीबी रॅम मेमरी आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. Moto G8 Power मध्ये 5,000 ची पावरफुल बॅटरी दिली जाऊ शकते जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच Moto G8 मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4,000एमएएच ची बॅैटरी दिली जाऊ शकते.

Moto G8 आणि Moto G8 Power क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर Moto G8 च्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस मिळू शकते. तसेच मोटो जी8 पावर मध्ये एफ/1.7 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस दिली जाऊ शकते. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here