5000एमएएच बॅटरी आणि पंच-होल डिस्प्ले सह Infinix Hot 9 इंडोनेशिया मध्ये झाला लॉन्च

91मोबाईल्सने याच आठवड्यात एक एक्सक्लूसिव बातमी प्रकाशित केली होती ज्यात सांगण्यात आले होते कि टेक कंपनी इनफिनिक्स आपल्या ‘हॉट सीरीज’ च्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो Infinix Hot 9 नावाने लॉन्च केला जाईल. इनफिनिक्स इंडियाच्या वेबसाइट वर हा फोन टीज केला गेला आहे जो पुढल्या महिन्यात भारतीय बाजारात येईल. पण भारतात येण्याआधी Infinix Hot 9 आज इंडोनेशिया मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन लो बजट सेग्मेंट मध्ये आला आहे जो येत्या 27 मार्च पासून तिथे विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Infinix Hot 9 च्या लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फोनची चारही बाजुंनी नॅरो बेजल्स सह येते तसेच डिस्प्लेच्या उजवीकडे पंचहोल देण्यात आला आहे. या होल मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या बॅक पॅनल बद्दल बोलायचे तर इथे उजवीकडे चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये उजवीकडे चार कॅमेरा सेंसर वर्टिकल शेप मध्ये आहेत तर डावीकडे फ्लॅश लाईट सह सेंसरची माहित लिहिण्यात आली आहे. बॅक पॅनल वरच चौकोनी आकाराचा फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट आणि उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Infinix Hot 9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता कंपनीने हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 6.6 इंचाच्या एचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड आधारित आहे जो एक्सओएस 6 वर चालतो. फोन मध्ये प्रोसेसर कोणता देण्यात आला आहे हि माहिती अजून समोर आली नाही पण आशा आहे कि इनफिनिक्स हॉट 9 मध्ये मीडियाटेक हीलियो चिपसेट दिला जाऊ शकतो.

इंडोनेशिया मध्ये हा फोन 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. आशा आहे कि भारतात पण Infinix Hot 9 चा हा वेरिएंट लॉन्च केला जाईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Infinix Hot 9 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारतात येणाऱ्या Infinix Hot 9 मध्ये प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल.

Infinix Hot 9 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. इंडोनेशिया मध्ये इनफिनिक्स हॉट 9 Rp 1,699,000 मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करंसीनुसार 7,500 रुपये होतात. एवढे मात्र निश्चित आहे कि भारतात येणारा Infinix Hot 9 इंडोनेशियन वर्जन पेक्षा जास्त पावरफुल असेल, फोनच्या भारतीय लॉन्च डेटसाठी सध्या वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here