मात्र 9,899 रुपयांमध्ये सेल होत आहे Infinix XPAD, जाणून घ्या ऑफर, किंमत आणि स्पेसिफिकेशन

इंफिनिक्सने आपल्या XPAD टॅबलेटची सेल सुरु केली आहे. हा या महिन्याच्या सुरुवातीला भारतात लाँच झाला होता. हे व्यावसायिक, विद्यार्थी आणि मनोरंजन साधकांसाठी योग्य आहे. तसेच Infinix XPAD परवडणाऱ्या किंमतीमध्ये 11 इंचाचा डिस्प्ले, 7,000mAh ची बॅटरी, फ्रंट व बॅक वर 8MP कॅमेरा, MediaTek चिपसेट सारखी वैशिष्ट्ये प्रदान करतो. जर तुम्ही पण एक नवीन आणि स्वस्त टॅबलेट शोधत आहात तर हा चांगला पर्याय आहे. चला, किंमत, स्पेक्स आणि ऑफर सविस्तर जाणून घेऊया.

Infinix XPAD ची किंमत आणि ऑफर

  • Infinix XPAD दोन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. ज्यात 4GB+128GB LTE + WiFi व्हर्जन 10,999 रुपयांना आहे.
  • मोठा स्टोरेज ऑप्शन 8GB+256GB LTE + WiFi 13,999 रुपयांमध्ये सेल होत आहे.
  • नवीन इंफिनिक्स टॅबलेट सह ग्राहक अतिरिक्त सूटचा लाभ घेऊ शकता, ज्याच्या मदतीने बेस मॉडेलची किंमत 9,899 रुपये होत आहे. यात बँक ऑफरचा समावेश आहे.
  • Infinix XPAD टॅबलेट टाईटन गोल्ड, स्टेलर ग्रे आणि फ्रॉस्ट ब्लू सारख्या तीन कलरमध्ये आणला जाऊ शकतो. तसेच, याला तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

Infinix XPAD चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Infinix XPAD मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 120Hz टच सॅम्पलिंग रेटसह 11-इंचाचा LCD FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • प्रोसेसर: नवीन टॅबलेट MediaTek Helio G99 चिपसेट द्वारे संचालित आहे ज्याला ARM G57 MC2 सह जोडले आहे.
  • रॅम आणि स्टोरेज: Infinix XPAD सह ग्राहकांना 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजची सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर मेमरीला मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढविले पण जाऊ शकते.
  • कॅमेरा: Infinix XPAD मध्ये 8MP चा रिअर कॅमेरा मिळतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी पण 8MP चा कॅमेरा आहे.
  • बॅटरी आणि चार्जिंग: Infinix XPAD मध्ये 7000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करतो.
  • ओएस: सॉफ्टवेअरच्या बाबतीत नवीन Infinix टॅबलेट Android 14 वर चालतो.
  • इतर: Infinix XPAD मध्ये युजर्सना USB टाईप-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, क्वॉड-स्टीरिओ स्पिकर साऊंड सिस्टम आणि ChatGPT सह Folax व्हॉईस असिस्टंट सारखे अनेक फिचर्स मिळतात.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here