6,200mAh बॅटरी, 100W चार्जिंगसह येऊ शकतो OnePlus Ace 5, जाणून घ्या माहिती

वनप्लस येत्या काही महिन्यामध्ये आपल्या सीरीजचा विस्तार करू शकते. यानुसार OnePlus Ace 5 आणि OnePlus Ace 5 Pro लाँच होण्याची शक्यता आहे. ही होम मार्केट चीनमध्ये येत्या सीरीज आहे ज्यालानंतर भारतासह ग्लोबल बाजारात नंबर सीरीज लाईनअप मध्ये आणले जाऊ शकते. परंतु अजून ब्रँडने घोषणा नाही केली, परंतु याआधी ही Ace 5 चे प्रमुख स्पेसिफिकेशन लीकमध्ये समोर आले आहेत. चला, पुढे माहिती जाणून घेऊया.

OnePlus Ace 5 चे स्पेसिफिकेशन (लीक)

  • OnePlus Ace 5 च्या स्पेसिफिकेशनची माहिती मायक्रो ब्लॉग्गिंग साईट वीबोवर टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने शेअर केली आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये पाहू शकता की वनप्लस ऐस 5 मध्ये 6.78-इंचाची 8T LTPO स्क्रीन मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर 1.5K पिक्सल रिजॉल्यूशन आणि मायक्रो-कर्वचर डिझाईन दिली जाऊ शकते.
  • परफॉरमेंससाठी वनप्लस ऐस 5 मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट लावली जाऊ शकते.
  • बॅटरीच्या बाबतीत वनप्लस ऐस 5 मध्ये 100W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 6,200mAh ची मोठी ड्युअल-सेल बॅटरी दिली जाऊ शकते.
  • लीकनुसार हे पण समजले आहे की वनप्लस ऐस 5 मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. डिव्हाईसमध्ये अलर्ट स्लाइडर पण मिळू शकतो.
  • तसेच OnePlus Ace 5 आणि OnePlus Ace 5 Pro फोन ग्लोबल आणि भारतीय बाजारात OnePlus 13 आणि OnePlus 13R च्या रूपामध्ये येऊ शकतो.

OnePlus Ace 3 चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: पूर्व मॉडेल वनप्लस ऐस 3 मध्ये 6.78-इंचाचा 1.5K 8T LTPO अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 4,500 निट्स पीक ब्राईटनेस काला सपोर्ट मिळतो.
  • प्रोसेसर: वनप्लस ऐस 3 मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट, एड्रेनो ग्राफिक्स आणि 9140mm² VC कूलिंगला सपोर्ट आहे.
  • मेमरी: डिव्हाईसमध्ये युजर्सना 16GB LPDDR5x RAM आणि 1TB UFS 4.0 इंटरनल स्टोरेज मिळते.
  • बॅटरी: मोबाईलमध्ये 100W वायर्ड चार्जिंगला सपोर्टसह 5,500mAh ची बॅटरी आहे.
  • कॅमेरा: फोनमध्ये OIS टेक्नॉलॉजीसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रावाइड स्नॅपर आणि 2MP चा मॅक्रो रिअर कॅमेरा आहे. तसेच, फ्रंटला 16MP चा सेल्फी लेन्स लावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here