इंफिनिक्सने गेल्याच महिन्यात आपल्या पहिल्या फ्लिप स्मार्टफोन Infinix Zero Flip ला ग्लोबल बाजारात लाँच केले आहे. तसेच, आता या डिव्हाईसची एंट्री भारतीय बाजारात पण कंफर्म झाली आहे. ब्रँडने अधिकृत स्तरावर टिझर शेअर करत इंफिनिक्स झिरो फ्लिपच्या भारतीय लाँचच्या तारखेवरून पडदा उठविला आहे. चला, पुढे तुम्हाला मोबाईलच्या सादर होण्याची तारीख आणि यात मिळणाऱ्या स्पेसिफिकेशनची माहिती देत आहोत.
Infinix Zero Flip भारतातील लाँचची तारीख कंफर्म
- इंफिनिक्स आपला पहिला फ्लिप स्मार्टफोन झिरो फ्लिप 5 जी येत्या 17 ऑक्टोबरला भारतात लाँच करेल.
- ब्रँडने लेटेस्ट टिझर शेअर करत ही माहिती दिली आहे. ज्याला तुम्ही खाली फोटो मध्ये पण पाहू शकता.
- चीनी कंपनीचा नवीन फ्लिप भारतात सॅमसंग आणि मोटोरोलाच्या फ्लिप फोनला टक्कर देईल.
- आशा आहे की यात मिळणारे स्पेसिफिकेशन ग्लोबल मॉडेल सारखे होऊ शकतात.
- किंमत पाहता Infinix Zero Flip ग्लोबल मार्केटमध्ये जवळपास 50,100 रुपयांमध्ये आला होता. परंतु भारतात याची किंमत आणि पण कमी होण्याचा अंदाज आहे.
Infinix Zero Flip ची वैशिष्ट्ये ( भारतात कंफर्म)
Infinix Zero Flip ची सर्वात मोठ्या विशेषतांमध्ये एक याचा 3.64 इंचाचा आऊटर डिस्प्ले आहे, जी सेगमेंटची सर्वात मोठी कव्हर स्क्रीन आहे. यात 120 हर्ट्स रिफ्रेश रेट मिळेल. हा बाहेरचा डिस्प्ले मल्टीटास्किंगला वाढवेल, ज्यामुळे डिव्हाईस ओपन न करता नोटिफिकेशन चेक करणे, मीडियाला नियंत्रित करणे आणि अॅप्स सह वापरणे सोपे होईल.
Infinix Zero Flip चा मजबूत हिंझ डिझाईन चांगल्या युजर एक्सपीरियंससाठी बनविला गेला आहे, जो दिन-प्रतिदिन निरंतर, विश्वसनीय प्रदर्शन देण्यासाठी 400,000 फोल्डचा सामना करू शकता.
Infinix Zero Flip चे स्पेसिफिकेशन (ग्लोबल)
- डिस्प्ले: Infinix Zero Flip मध्ये 6.9-इंचाचा FHD+ LTPO अॅमोलेड प्रायमरी डिस्प्ले आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 1400 निट्स पीक ब्राईटनेस मिळते. तसेच, फ्रंटला 120Hz रिफ्रेश रेट, गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शन आणि 1100 निट्स पीक ब्राईटनेस सह 3.64-इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.
- प्रोसेसर: Infinix Zero Flip फोनमध्ये MediaTek Dimensity 8020 प्रोसेसर देण्यात आला आहे.
- स्टोरेज: फोनमध्ये 8GB रॅम आणि 512 जीबी UFS 3.1 स्टोरेजची सुविधा देण्यात आली आहे.
- कॅमेरा: Infinix Zero Flip मध्ये OIS सह 50MP चा Samsung GN5 प्रायमरी आणि 50MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तसेच, सेल्फीसाठी ऑटोफोकस सह 50MP चा Samsung JN1 फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी आणि चार्जिंग: Infinix Zero Flip मध्ये 70W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आणि 10W वायर्ड रिवर्स चार्जिंगला सपोर्टसह 4,720mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
- ओएस: हा मोबाईल XOS 14.5 आणि अँड्रॉईड 14 सह मिळून चालतो.
- इतर: Infinix Zero Flip मध्ये साईड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, JBL ड्युअल स्पिकर, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.4 ड्युअल सिम 5G, 4G सारखे अनेक पर्याय आहेत.