लॉन्च च्या आधी समोर आला नॉच डिसप्ले वाल्या नोकिया एक्स6 चा आॅफिशियल फोटो, 16 मे ला होईल लॉन्च

नोकिया कडून बातमी आली होती की ब्रांड चे मालकी हक्क असणारी फिनलँड ची कंपनी एचएमडी ग्लोबल एक हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन वर काम करत आहे जो नोकिया एक्स6 नावाने लॉन्च केला जाईल. नो​किया एक्स6 16 मे ला चीन मध्ये सादर करण्यात येईल त्यानंतर येणार्‍या आठवड्यांमध्ये हा भारता सह जगातील इतर बाजारांमध्ये लॉन्च होईल. पण आता नोकिया एक्स6 च्या लॉन्च च्या आधी या फोन चा आॅफिशियल फोटो समोर आला आहे. नोकिया एक्स6 चा फोटो समोर आल्याने हे समजले आहे की कंपनी हा फोन अॅप्पल आयफोन सारख्या बेजल लेस नॉच डिसप्ले वर सादर करेल.

नोकिया एक्स6 चा हा आॅफिशियल फोटो एका कँपेन च्या माध्यमातून समोर आला आहे. हा फोन 16 मे ला चीन मध्ये लॉन्च होणार आहे. नोकिया एक्स6 च्या लॉन्च च्या आधी कंपनी ने चीनी रिटेल पार्टनर सोबत मिळून एक कँपेन सुरू केली आहे, ज्यात फोटोग्राफी स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना कंपनी कडून बक्षीसा सह नोकिया एक्स6 पण मोफत दिला जात आहे. एचएमडी ग्लोबल च्या या कँपेन मध्ये नोकिया च्या आगामी स्मार्टफोन चा फोटो वापरण्यात आला आहे आणि त्यातून आम्हाला या फोन च्या डिजाईन व लुक ची माहिती मिळाली आहे.

नोकिया एक्स6 ला कंपनी ने 19:9 आस्पेक्ट रेशियो वाली बेजल लेस नॉच डिसप्ले वर बनवले आहे. हा फोन 1080 x 2280 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.8-इंचाच्या फुल एचडी+ डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे. कंपनी नोकिया एक्स6 चे दोन वेरिएंट सादर करू शकते. एक वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट दिला जाईल तर दूसरा वेरिएंट 4जीबी रॅम सह मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालेल. नोकिया एक्स6 चे हे दोन्ही वेरिएंट एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असतील. फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

फोन च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप चा डुअल रियर कॅमेरा दाखविण्यात आला आहे जो 12 मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर सह येतो. कॅमेरा सेटअप च्या खाली फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 5 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा असण्याचा लीक समोर आला आहे. कंपनी कडून नोकिया एक्स6 ब्लॅक आणि व्हाईट कलर मध्ये सादर केला जाऊ शकतो. तर समोर आलेल्या फोटो मध्ये हा फोन ग्लास बॅक पॅनल वर बनलेला दिसत आहे.

नोकिया एक्स6 च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमती साठी आता 16 मे ची वाट बघावी लागेल. तसेच हा फोन भारतात उपलब्ध होईल की नाही याबद्दल काही बोलणे आता घाईचे ठरेल. विशेष म्हणजे टेक जगामध्ये 16 मे ला नोकिया एक्स6 च्या लॉन्च व्यतिरिक्त भारतात 15 मे ला आॅनर 10 आणि 17 मे ला वनप्लस 6 स्मार्टफोन पण लॉन्च होत आहे. या स्मार्टफोन्स चे अपडेट तुम्हाला आमच्या वेबसाइट मिळत राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here