आयफोन 16 सीरीज सादर करण्यात आली आहे. इट्स ग्लोटाईम ॲपल कार्यक्रमाद्वारे iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max भारतात लाँच झाले आहेत. नवीन आयफोन्स सोबत ॲपलने iOS 18 ची देखील घोषणा केली आहे. ही नवीन ॲपल ऑपरेटिंग सिस्टम 16 सप्टेंबर रोजी रिलीज होईल, ज्याला सर्व ॲपल वापरकर्ते त्यांच्या आयफोन मध्ये डाऊनलोड आणि इन्स्टॉल करू शकतील. नवीन आयओएसशी संबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
iOS 18 कधी मिळेल?
ॲपलने घोषणा केली आहे की कंपनीची नवीन ऑपरेटिंग सिस्टम iOS 18 भारतात 16 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल. या तारखेपासून नवीन iOS सपोर्टेड ॲपल मोबाईल्स वर आणले जाईल आणि आयफोन वापरकर्ते त्याचा वापर करू शकतील. iOS 18 ला सपोर्ट करणाऱ्या फोन्सचे तपशील तुम्ही पुढे वाचू शकता.
कोणत्या iPhones वर मिळेल iOS 18?
आयओएस 18 ला ॲपलच्या एकूण 28 आयफोन्स वर आणले जाईल. कंपनीच्या वतीने नवीन ऑपरेटिंग सिस्टीम ला 7 जनरेशन जुन्या मॉडेल्सवर देखील रिलीज केले जाईल. iOS 18 ला मिळवणारे आयफोन्स:
iPhone 16
iPhone 16 Plus
iPhone 16 Pro
iPhone 16 Pro Max
iPhone 15
iPhone 15 Plus
iPhone 15 Pro
iPhone 15 Pro Max
iPhone 14
iPhone 14 Plus
iPhone 14 Pro
iPhone 14 Pro Max
iPhone 13
iPhone 13 mini
iPhone 13 Pro
iPhone 13 Pro Max
iPhone 12
iPhone 12 mini
iPhone 12 Pro
iPhone 12 Pro Max
iPhone 11
iPhone 11 Pro
iPhone 11 Pro Max
iPhone XS
iPhone XS Max
iPhone XR
iPhone SE 3rd Gen
iPhone SE 2nd Gen
iOS 18 साठी किती पैसे लागतील?
ॲपल आयफोन वापरकर्ते नवीन iOS 18 ला पूर्णपणे मोफत वापरू शकतील. कंपनी आपल्या ऑपरेटिंग सिस्टमच्या नवीन व्हर्जनसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. आयओस 18 हे एक मोफत सॉफ्टवेअर अपडेट आहे जे कंपनीच्या सर्व पात्र वापरकर्त्यांना मिळेल. आयओस 18 चे सर्व फिचर्स विनामूल्य वापरली जाऊ शकतात. या फिचर्सबद्दल तुम्ही पुढे वाचू शकता.
iOS 18 चे फिचर्स
आयओस 18 मध्ये कस्टमायझेबल होम स्क्रीन मिळेल. यामध्ये ॲप्सची कोणत्याही ठिकाणी व्यवस्था करता येते. नवीन ओएस मध्ये तुमच्या आवडत्या ॲपला डॉक वर देखील ठेवले जाऊ शकते आणि कंट्रोल सेंटर मध्ये थर्ड पार्टी ॲप देखील समाविष्ट होऊ शकते.
होम स्क्रीन सोबतच यामध्ये कंट्रोल सेंटर ला देखील कस्टमाईझ केले जाऊ शकते. यामध्ये विजेट्सचे प्लेसमेंट, मीडिया प्लेबॅक आणि इतर शॉर्टकट्स यांना सोयीनुसार बदलता येऊ शकते. लेआऊट ला देखील बदलले जाऊ शकते.
iOS 18 मध्ये आयफोन वापरकर्ते त्यांच्या आवडीनुसार ॲप्सचे लूक देखील बदलू शकतील. कंपनीकडून डार्क आणि टिंटेड कस्टमायझेशन सादर केले जाईल ज्याद्वारे ॲपचा रंग देखील बदलला जाऊ शकतो. नवीन ओएस मध्ये ॲप आयकॉन आणि विजेट्सचा आकार देखील बदलला जाऊ शकतो.
नवीन आयओएस 18 मध्ये वापरकर्त्यांना ॲप्स लॉक करण्याची सुविधा देखील मिळणार आहे. वापरकर्ते ॲप्स लपवू शकतील. हे थेट होम स्क्रीनवरून फेस आयडीने लॉक केले जाऊ शकतात. या लॉक केलेल्या ॲप्सना फोन मालकाच्या परवानगीशिवाय ओपन करता येत नाही.
नवीन ॲपल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये फोटो ॲप ला देखील पुन्हा डिझाईन केले गेले आहे. ते पूर्वीपेक्षा अधिक पद्धतशीर असेल. स्थान, वेळ आणि कार्यक्रमानुसार फोटोंचे ग्रुपिंग केले जाऊ शकते, ज्यामुळे ते शोधणे आणि पाहणे सोपे होईल. क्षणांनुसार संग्रह तयार केले जाऊ शकतात आणि आवडते संग्रह पिन केले जाऊ शकतात.
गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने iOS 18 देखील पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यात आला आहे. डेटा लीक आणि फोन हॅकिंगसारख्या समस्यांपासून वाचण्यासाठी फोनमध्ये फॅक्टर ऑथेंटिकेशन असेल. कोणत्या ॲपला कोणत्या फोन सेवेचा ॲक्सेस द्यायचा आणि कोणता नाही हे वापरकर्ते स्वतः निवडू शकतील.
आयओएस 18 मध्ये कॉन्टॅक्ट शेअरिंग देखील पूर्वीपेक्षा अधिक नियंत्रित असेल. वापरकर्त्यांना डिस्ट्रक्शन कंट्रोल फिचरसह नवीन पासवर्ड ॲप्लिकेशन देखील मिळेल. किचेनसह ॲपल आयडीद्वारे सर्व डिव्हाईस तपशील आणि ॲप पासवर्ड सुरक्षितपणे संग्रहित केले जातील. तर कमकुवत पासवर्ड किंवा मुदत संपलेल्या पासवर्डची माहितीही उपलब्ध असेल.
आयफोन्स मधील गेमिंग अनुभवाला आणखी सुधारण्यासाठी कंपनी एक डेडीकेटेड गेम मोड देखील सादर करेल जो आयओएस 18 मध्ये उपलब्ध असेल.यात स्मुथ फ्रेम रेट, टच आणि हॅप्टिक, व्हायब्रेशन इत्यादी सोबतच डू नॉट डिस्टर्ब यांसारखे फिचर्स देखील समाविष्ट असतील.
ॲपल आयओएस 18 मध्ये सॅटेलाईट फिचर जोडण्यात आले आहे. यामुळे वापरकर्ते आयफोनमध्ये नेटवर्क नसतानाही iMessage पाठवू शकतील. याशिवाय मेसेज ॲपमध्ये शेड्युलिंगचा देखील पर्याय मिळेल. हे सर्व काम थेट सॅटेलाईटच्या माध्यमातून होणार असून फोनमध्ये नेटवर्क नसतानाही त्याचा वापर करता येणार आहे.
नवीन आयओएस 18 मध्ये ॲपल इंटेलिजन्स फिचर्स देखील समाविष्ट केले जाईल. गोपनीयता, भाषा, फोटो आणि क्रिया यांसारख्या चार मुख्य फोकसवर आधारित ॲपल इंटेलिजन्स हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इंटीग्रेशन सोबतच वैयक्तिक अनुभव देखील प्रदान करेल.
iOS 18 मध्ये सफारी, मॅप्स, मेल, वॉलेट, नोट्स आणि जर्नल यांना देखील अपग्रेड आणि ॲडव्हान्स केले गेले आहे. या आयओएस 18 च्या फिचर्सबद्दल तपशीलवार माहितीसाठी (येथे क्लिक करा)
iOS 18 कसे डाऊनलोड करावे
आयओएस 18 हे 16 सप्टेंबरपासून डाऊनलोडसाठी उपलब्ध होईल. हे मिळवण्यासाठी तुमचा आयफोन आधीच iOS 17 वर अपडेट केलेला असणे आवश्यक आहे. नवीन ऑपरेटिंग सिस्टीम फोनमध्ये डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्यापूर्वी मोबाईलला किमान 60% चार्ज करा आणि मजबूत इंटरनेट कनेक्शनशी कनेक्ट करा. आयओएस 18 आयफोन मध्ये किती स्टोरेज घेतले जाईल, हे ॲपलकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु आमचा सल्ला आहे की फोनमध्ये सुमारे 8GB स्पेस मोकळा ठेवणे चांगले आहे.
आयओएस 18 डाऊनलोड करण्याची पद्धत
आयफोन सेटिंग्ज
>
जनरल
>
सॉफ्टवेअर अपडेट
>
आयओएस18
>
डाउनलोड आणि इन्स्टॉल
वरील स्टेप्स फॉलो केल्यानंतर आणि ॲपल फेस आयडीवर ओळखीची पुष्टी केल्यानंतर लगेचच तुमच्या आयफोन वर नवीन आयओएस व्हर्जन डाऊनलोड करणे सुरू होईल. संपूर्ण फाईल फोन मध्ये डाऊनलोड झाल्यानंतर त्या फाईल्सला कधी इन्स्टॉल करायच्या याची तुम्ही निवड करू शकता. लक्षात ठेवा की इंस्टॉलेशन दरम्यान फोन रिस्टार्ट होईल, त्यामुळे तुमच्या सोयीनुसार वेळ निवडा.
टीप: आयओएस 18 अधिकृत रोलआऊट 16 सप्टेंबर रोजी होत आहे परंतु तरीही त्याला आपल्या आयफोन पर्यंत पोहोचण्यासाठी काही दिवसांचा वेळ लागू शकतो.