Samsung नं आणले दोन नवीन टॅबलेट Galaxy Tab A9 आणि Tab A9+, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • Samsung नं दोन मिड रेंज टॅबलेट सादर केले आहेत.
  • ह्यात 5जी आणि फक्त वायफायचा ऑप्शन मिळतो.
  • हे अ‍ॅमेझॉन आणि अन्य आउटलेटवर विकले जातील .

टेक दिग्गज सॅमसंगनं भारतात आपल्या मिड रेंज टॅबलेट प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Samsung Galaxy Tab A9 आणि Samsung Galaxy Tab A9+ सादर केले आहेत. ह्या टॅब ए9 सीरीजचे टॅबलेट भारतात ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन आणि अन्य आउटलेटवर विकले जातील. डिवाइसमध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले, दमदार प्रोसेसर आणि कॅमेरासह अनेक फीचर्स मिळत आहेत.

गॅलेक्सी टॅब A9 आणि टॅब A9 प्लस ची किंमत आणि उपलब्धता

  • सॅमसंग गॅलेक्सी टॅब A9 कंपनीनं 4GB रॅम + 64GB स्टोरेज ऑप्शनमध्ये आणला आहे. हा वायफाय + 5जी आणि फक्त वायफाय कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये येतो. तर सॅमसंग गॅलेक्सी टॅब A9+ ब्रँडनं 4GB रॅम + 64GB आणि 8GB + 128GB स्टोरेज मध्ये लाँच केला आहे.
  • सॅमसंग गॅलेक्सी टॅब A9 टॅबच्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज वायफाय मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. तर वाय-फाय आणि 5जी मॉडेल 15,999 रुपयांना पडेल.
  • सॅमसंगचा टॅब A9 प्लस 4GB रॅम +64GB स्टोरेज 5G आणि वायफाय टेक्नॉलॉजी मध्ये 22,999 रुपयांमध्येवर लाँच झाला आहे. तर 8GB रॅम +128GB वायफाय मॉडेल 20,999 रुपयांचा आहे.
  • गॅलेक्सी टॅब A9 ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध आहे. तर A9 प्लस प्री-ऑर्डर करता येईल.
  • कलर ऑप्शन पाहता A9 सीरीजचे दोन्ही मॉडेल सिल्व्हर, ग्रे आणि डार्क ब्लू अश्या तीन कलरमध्ये येतात.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए9 प्लसचे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: गॅलेक्सी टॅब ए9 प्लस मध्ये 11-इंचाचा एलसीडी WQXGA डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1920 × 1200 पिक्सेल रिजॉल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर: परफॉर्मन्ससाठी एड्रेनो 619 GPU सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे.
  • स्टोरेज: डेटा स्टोरेजसाठी 4GB, 8GB रॅमसह 64GB, 128GB इंटरनल स्टोरेज ऑप्शन मिळतात. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील आहे.
  • कॅमेरा: सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए9 प्लस मध्ये 8MP चा रियर आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे.
  • बॅटरी: डिवाइसमध्ये 7040mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी मोठा बॅकअप देते.
  • OS: हा टॅबलेट वनयुआय 5.1 आधारित अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • वजन आणि डायमेंशन: ह्या सॅमसंग टॅबचे वजन 510 ग्राम आणि डायमेंशन 257.1 × 168.7 × 6.9 मिमी आहे.
  • कनेक्टिव्हिटी: ह्यात ड्युअल-सिम (नॅनो+ईसिम), 5जी (ऑप्शनल), वायफाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.3 सारखे फीचर्स आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए9 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए9 मध्ये 8.7-इंचाचा चएलसीडी WQXGA डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात 800 × 1340 पिक्सेल रिजॉल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेट मिळतो.
  • प्रोसेसर: चांगल्या परफॉर्मन्ससाठी G57 GPU सह मीडियाटेक हेलियो G99 चिपसेट देण्यात आला आहे.
  • स्टोरेज: टॅबमध्ये 4GB रॅम + 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळतो.
  • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता ह्यात 8MP चा रियर आणि 2MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
  • बॅटरी: डिवाइसमध्ये 5100mAh ची बॅटरी मिळते जी मोठा बॅकअप देते.
  • ओएस: सॉफ्टवेयर ऑप्शन पाहता हा वनयुआय 5.1 सह अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • वजन आणि डायमेंशन: हा डिवाइस 366 ग्राम आणि 210.9 × 124.7 × 8.0 मिमी आहे.
  • कनेक्टिव्हिटी: ह्यात ड्युअल-सिम (नॅनो+ईसिम), एलटीई (ऑप्शनल), वायफाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.3 सारखे फीचर्स मिल जाते आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here