वनप्लसनं 2023 च्या सुरुवातीला आपल्या नंबर सीरीजमध्ये OnePlus 11 जोडीला होता. तर आता OnePlus 12 च्या बातम्या समोर येत आहेत. ह्या मॉडेलसह 12R देखील येण्याची शक्यता आहे. दोन्ही फोनच्या लाँचला खूप वेळ बाकी आहे, परंतु त्याआधीच वनप्लस 12आर चे रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
OnePlus 12R रेंडर्स (लीक)
- OnePlus 12R च्या रेंडर्स आणि स्पेसिफिकेशन्सची नवीन लीक माय स्मार्ट प्राइस आणि ऑनलीक्सच्या माध्यमातून समोर आली आहे.
- तुम्ही फोटो मध्ये पाहू शकता की डिवाइस व्हाइट कलर ऑप्शनमध्ये दिसत आहे. डिवाइसमध्ये फ्लॅट बेजल लेस डिस्प्ले मिळतो.
- डिस्प्लेच्या फ्रंटला पंच होल डिजाइन दिसत आहे, ज्यात सेल्फी कॅमेरा आहे.
- फोनचा बॅक पॅनल पाहता ह्यात सर्कुलर कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे जो OnePlus 11 सारखा वाटत आहे.
- असं देखील समोर आलं आहे की डिवाइसमध्ये अलर्ट स्लाइडर आणि पावर बटन उजवीकडे असेल. तर वॉल्यूम बटन डावीकडे दिला जाईल.
- तसेच यूएसबी टाइप सी पोर्ट, स्पिकर ग्रिल खालच्या बाजूला असतील.
- बॅक पॅनलवर मधोमध वनप्लसची ब्रँडिंग देण्यात आली आहे.
- एकंदरीत फोन बहुतांश OnePlus 11 सारखा दिसत आहे.
OnePlus 12R स्पेसिफिकेशन्स (लीक)
- डिस्प्ले : डिवाइसमध्ये 6.7 इंचाचा 1.5के अॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट देऊ शकतो.
- प्रोसेसर : फोनमध्ये कंपनी कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरचा वापर करू शकते.
- स्टोरेज : डिवाइस 16GB पर्यंत रॅम + 256 जीबी इंटरनल स्टोरेजसह येऊ शकतो. लाँचच्या वेळी इतर मॉडेल देखील येऊ शकतात.
- कॅमेरा : फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 32 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स 2X झूम सह आणि 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड कॅमेरा लेन्स मिळू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स असू शकते.
- बॅटरी : फोनमध्ये 5500mAh ची बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.
- ओएस : ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा मोबाइल अँड्रॉइड 14 आधारित ऑक्सीजन ओएस 14 वर चालू शकतो.
- अन्य : ह्यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर,अलर्ट स्लाइडर, ड्युअल सिम 5G, वायफाय, ब्लूटूथ सारखे इतर फीचर्स मिळू शकतात.