या ‘खास’ डिजाइन सह येत आहे iPhone 12, लॉन्चच्या आधी बघा लुक

Apple iPhone 12 बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. आता पर्यंत या फोन बाबत अनेक लीक्स समोर आले आहेत. जर टिप्सटर Jon Prosser द्वारे देण्यात आलेल्या माहिती वर विश्वास ठेवला तर आईफोन 12 ची घोषणा ऑक्टबर मध्ये होऊ शकते. आता लॉन्च इवेंटच्या आधी आईफोन 12 च्या डिजाइन बाबत नवीन माहिती समोर आली आहे. अधिकृत लॉन्चच्या आधी आईफोन 12 च्या 5.4-inch, 6.1-inch, 6.7-inch मॉडेल व आईफोन 12 प्रो मॉडेलचे फोटो ऑनलाइन लीक झाले आहेत. हे फोटो केस मेकरने दिले आहेत जे 9to5Mac च्या एका रिपोर्ट मध्ये समोर आले आहेत.

या डमी यूनिट्स वरून फोनच्या डिजाइन बाबत बरीच माहिती मिळाली आहे. असे वाटते आहे कि Apple फ्लॅट-कडा असेलल्या डिजाइन सह आपले नवीन फोन सादर करण्याची योजना बनवत आहे. आईफोन 6 द्वारे कंपनी आपल्या फोन मध्ये कर्व्ड डिजाइन उपलब्ध करत आहे. रिपोर्टनुसार नवीन आईफोनची डिजाइन iPhone 4 सारखी असू शकते जो 10 वर्षांपूर्वी लॉन्च झाला होता. याआधी पण अनेक लीक्स मध्ये असा दावा केला गेला आहे.

लॉन्चला उशीर

यावेळी iPhone 12 मार्केट मध्ये येण्यास उशीर होऊ शकतो. आता पर्यंत समोर आलेल्या अनेक रिपोर्ट्सनुसार हा उशीर आईफोन प्रोडक्शनमुळे होत आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः कंपनीने कन्फर्म केले होते कि iPhone 12 सीरीज यावर्षी उशिरा येईल.

स्पेसिफिकेशन्स

आता पर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार आईफोन 12 मधील डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सह येईल. तसेच ऍप्पल आईफोन 12 मोठ्या बॅटरी सह सादर केला जाऊ शकतो. तसेच बेस मॉडेल मध्ये कंपनी 5.4 इंचाचा OLED डिस्प्ले, A14 चिपसेट, 5जी कनेक्टिविटी आणि ड्यूल-कॅमेरा सेटअप सारखे फीचर्स देऊ शकते.

चार मॉडेल होतील लॉन्च

वर सांगितल्याप्रमाणे समोर आलेल्या माहिती नुसार या सीरीज अंतर्गत चार मॉडेल्स- iPhone 12, iPhone 12 Max, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max येतील. हे मॉडेल्स 5.4 इंच, 6.1 इंच आणि 6.7 इंच मध्ये सादर केले जातील. तसेच एक वीडियो समोर आला होता, ज्यानुसार iPhone 12, iPhone 12 Max मध्ये डुअल कॅमेरा सेटअप आणि iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार असल्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here