डायनॅमिक आयलंडसह LeEco S1 Pro लाँच

Highlights

  • LeEco S1 Pro हुबेहूब iPhone 14 Pro सारखा दिसतो.
  • आयफोन 14 प्रो मॉडेल्समधील डायनॅमिक आयलंडमधील फिचर देखील कॉपी करण्यात आलं आहे
  • सध्या फोन चीनमध्ये सादर करण्यात आला आहे

टेक दिग्गज अ‍ॅप्पल कंपनीनं गेल्यावर्षी आपली लेटेस्ट फ्लॅगशिप iPhone 14 सीरिज सादर केली होती. यात कंपनीनं चार मॉडेल सादर केले होते, ज्यातील 1,20,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या टॉप प्रो मॉडेल्सची खासियत म्हणजे त्यात मिळणारं डायनॅमिक आयलंड. आयफोन प्रेमी या फिचरचं कौतूक करताना थकत नाहीत परंतु आता एका अँड्रॉइड स्मार्टफोन कंपनीनं तेच डायनॅमिक आयलंड फिचर आणि आयफोन 14 प्रो सारखा हुबेहूब दिसणारा LeEco S1 Pro स्मार्टफोन सादर केला आहे.

LeEco S1 Pro ला कोणत्याही अँगलनं बघितला तरी तो iPhone 14 Pro सारखा दिसतो. कंपनीनं हा आयफोनचा क्लोन स्मार्टफोन चीनमध्ये सादर केला आहे. या फोनच्या डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी पिल शेप कट आऊट देण्यात आलं आहे. स्मार्टफोनच्या मागच्या बाजूला असलेला कॅमेरा आयलंड देखील iPhone 14 Pro मधून उचलण्यात आलं आहे. पुढे आम्ही LeEco S1 Pro स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

LeEco S1 Pro चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

  • 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले
  • हुवावे मोबाइल सर्व्हिसचा सपोर्ट
  • डायनॅमिक आयलंड फिचर
  • 8GB RAM, 256GB स्टोरेज
  • 5000mAh ची बॅटरी

LeEco S1 Pro स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमधील अँड्रॉइड व्हर्जनची माहिती मिळाली नाही. परंतु यात चीनमध्ये गुगल मोबाइल सर्व्हिस (GMS) नसल्यामुळे हुवावे मोबाइल सर्व्हिस (HMS) देण्यात आली आहे. फोटोजमध्ये दाखवल्याप्रमाणे नोटिफिकेशन्ससाठी यात आयफोनमधील डायनॅमिक आयलंड फिचर देण्यात आला आहे.

प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 12nm फॅब्रिकेशन प्रोसेसवर बनलेला आणि 1.8Ghz स्पीड असलेल्या Unisoc T7150 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी Imagination 9446 GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.

पावर बॅकअपसाठी LeEco S1 Pro स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर फोनच्या मागे 13-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. अन्य कॅमेरा सेन्सरची माहिती मिळाली नाही. हा फोन 9.5mm जाड आहे आणि याचे वजन 200 ग्राम आहे.

LeEco S1 Pro ची किंमत

LeEco S1 Pro स्मार्टफोन सध्या चीनमध्ये प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. फोनच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 899 युआन (सुमारे 11 हजार रुपये) ठेवण्यात आली आहे. LeEco कंपनीनं जगभरातील आपला गाशा कधीच गुंडाळला आहे त्यामुळे हा फोन चीनच्या बाहेर उपलब्ध होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here