Samsung ने या महिन्याच्या सुरवातीला आपल्या ‘गॅलेक्सी ए’ सीरीज मधील स्मार्टफोन Samsung Galaxy A70s ची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर असे बोलले जात होते कि आता सॅमसंग लवकरच Samsung Galaxy A71 बाबत भारतात एखादी घोषणा करू शकते. पण गॅलेक्सी ए71 च्या लॉचच्या आधी आता सॅमसंगचा अजून एक नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A70e नावाने समोर आला आहे. या रिपोर्ट मध्ये या स्मार्टफोनचे फोटोज शेयर करण्यात आले आहेत ज्यावरून फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे.
Samsung Galaxy A70e ची रेंडर ईमेज प्रसिद्ध टिप्सटर आनलीक्स सोबत शेयर करण्यात आली आहे. समोर आलेल्या फोटोज मध्ये फोन सर्व अँगलने दाखवण्यात आला आहे ज्यात फोनच्या सर्व पॅनल्स, पोर्ट्स आणि सेंसर्सचा खुलासा झाला आहे. थेट फोनची डिजाईन पाहता रेंडर ईमेज नुसार गॅलेक्सी ए70ई स्मार्टफोन बेजल लेस इनफिनिटी यू डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी ए70 आणि गॅलेक्सी ए70एस मध्ये पण अशीच नॉच देण्यात आली होती. डिस्प्लेच्या खालच्या बाजूला चिन पार्ट पण आहे.
अशी असेल डिजाईन
फोनची डिजाईन पाहता Samsung Galaxy A70e च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये रक्तच रांगेत तीन कॅमेरा सेंसर्स आणि खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि खालच्या बाजूला Samsung ची ब्रॅंडिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. तसेच Samsung Galaxy A70e च्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक आहे तर खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आहे. लोवर पॅनल वर यूएसबी पोर्टच्या उजवीकडे स्पीकर आणि डावीकडे सिम स्लॉट देण्यात आला आहे. रेंडर आणि वीडियो मध्ये Samsung Galaxy A70e सफेद आणि ब्लॅक कलर मध्ये दाखवण्यात आला आहे.
Samsung Galaxy A70s
सॅमसंग गॅलेक्सी ए70एस भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता ज्यात 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅम आहे. हे दोन्ही वेरिएंट 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. फोनचा 6 जीबी रॅम वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता तर 8 जीबी रॅम वेरिएंट 30,999 रुपयांमध्ये बाजारात आला होता. आता या दोन्ही वेरिएंट्सच्या किंटमी 2,000 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. प्राइस कट नंतर Samsung Galaxy A70s चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 26,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Samsung Galaxy A70s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह येतो ज्यात स्क्रीन वर टच करताच फोन अनलॉक होतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला होता जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. Samsung Galaxy A70s डुअल सिम व 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A70s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेल्या 64-मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरला सपोर्ट करतो. सोबत फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी आणि 8-मेगापिक्सलचा थर्ड सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए70एस मध्ये 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.