200W फास्ट चार्जिंग सपोर्टसह चीनमध्ये iQOO 11S लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • फोनमध्ये 16GB रॅम आणि 1TBGB पर्यंतची स्टोरेज आहे.
  • हा स्मार्टफोन iQOO 11 सीरीजचा तिसरा हँडसेट आहे.
  • iQOO 11S मध्ये 200W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

iQOO नं चीनमध्ये आपल्या iQOO 11 सीरीजमध्ये नवीन iQOO 11S लाँच केला आहे. नव्याने बाजारात आलेला हा फोन 144Hz रिफ्रेश रेट, 1800 निट्स ब्राइटनेस आणि 3200 x 1440 पिक्सल रेजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरवर चालतो. चला जाणून घेऊया ह्या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.

iQOO 11S ची किंमत आणि उपलब्धता

  • डिवाइसच्या 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत CNY 3799 (जवळपास 43,156 रुपये) आहे.
  • 16जीबी रॅम आणि 256G स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 4099 (जवळपास 46,600 रुपये) आहे.
  • 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 4399 (जवळपास 49,900 रुपये) आहे.
  • 16GB रॅम आणि 1TBGB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 4,799 (जवळपास 54,518 रुपये) आहे.
  • हा डिवाइस चीनमध्ये 10 जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

iQOO 11s चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : iQOO 11s मध्ये 2K रेजोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा E6 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • प्रोसेसर : स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरवर आधारित आहे.
  • रॅम आणि स्टोरेज : iQOO 11s 12GB + 256GB, 16GB + 256GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB च्या चार व्हेरिएंटमध्ये येतो.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी iQOO 11s मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50MP Sony VCS IMX866 सेन्सर, 13MP पोर्ट्रेट लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी ह्यात फ्रंटला 16MP चा कॅमेरा आहे.
  • ओएस : सॉफ्टवेयर पाहता QOO 11s अँड्रॉइड 13-आधारित ओरिजिन ओएस 3.0 आउट-ऑफ-द-बॉक्स चालतो.
  • बॅटरी : स्मार्टफोनमध्ये 200W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,700mAh ची बॅटरी आहे.
  • कनेक्टिव्हिटी ऑप्शन : तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम सपोर्ट, 4G LTE, 5G आणि वाय-फाय 7 चा समावेश करण्यात आला आहे.
  • कलर : iQOO 11s ट्रॅक व्हर्जन (व्हाइट), कियानतांग टिंगचाओ (सियान) आणि लेजेंडरी व्हर्जन (ब्लॅक) अशा तीन रंगात येतो.

iQOO 11S भारतात येणार का?

iQOO 11S सध्या फक्त चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच कंपनीनं ह्याच्या इंडिया लाँच बद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे अजूनतरी ठोस काही सांगता येणार नाही, परंतु तुम्ही भारतात iQOO 11 5G विकत घेऊ शकता जो काही महिन्यांपूर्वी आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here