दमदार स्मार्टफोन बनवण्याच्या बाबतीत iQOO कंपनी गेल्या काही दिवसांपासून खूप सक्रिय झाली आहे. अलीकडेच iQOO 11S डिवाइस दमदार फीचर्ससह चीनमध्ये आला होता. तर, आता कंपनी आपली नंबर सीरीज वाढवण्यासाठी iQOO 12 आणण्याची तयारी करत आहे. असं सांगितलं जात आहे की हा डिवाइस फ्लॅगशिप लेव्हल फीचर्ससह येऊ शकतो. पुढे आम्ही लीक रिपोर्टमधून समोर आलेली माहिती दिली आहे.
iQOO 12 5G
iQOO 12 बद्दल टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं माहिती दिली आहे. त्यानं असं सांगितलं आहे की डिवाइस सर्वप्रथम चीनमध्ये येईल, त्यानंतर हा इतर बाजारपेठांमध्ये लाँच केला जाईल. अद्याप लाँच तारीख ठरली नाही परंतु हा फोन ह्या वर्षीच्या अखेरीस लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे.
iQOO 12 स्पेसिफिकेशन्स (लीक)
- डिस्प्ले : iQOO 12 च्या डिस्प्लेच्या आकाराची माहिती मिळाली नाही परंतु हा डिवाइस 2K रिजॉल्यूशन असलेल्या अॅमोलेड डिस्प्लेसह येऊ शकतो. ह्यात 144hz रिफ्रेश रेट आणि चांगला व्हिज्युअल एक्सपीरियंस मिळू शकतो.
- प्रोसेसर : लीकनुसार ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मिळू शकतो. हा प्रोसेसर अद्याप बाजारात आला नाही. ह्याचा लाँच येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. हा इंडस्ट्रीमधील बेस्ट आणि सर्वात शक्तिशाली प्रोसेसर असू शकतो.
- स्टोरेज : हा डिवाइस 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे. लाँचच्या वेळी अन्य मॉडेल देखील समोर येऊ शकतात.
- कॅमेरा : iQOO चा नवीन डिवाइस ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. ह्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळण्याची शक्यता आहे. अन्य कॅमेरा लेन्स आणि सेल्फी कॅमेऱ्याची माहिती मिळाली नाही.
- बॅटरी : नवीन मोबाइलमध्ये 4700 किंवा 5000mAh ची बॅटरी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते.
- कनेक्टिव्हिटी : डिवाइसमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, ब्लूटूथ, वायफाय आणि अन्य बेसिक फीचर्स देण्यात आले आहेत.
- ओएस : स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर आधारित असू शकतो.