जियो बनली देशातील सर्वात फास्ट 4जी स्पीड असलेली कंपनी, नंबर वन पॉजिशन सोबत बनवला नवीन रेकॉर्ड

रिलायंस जियो भारतातील एकमात्र अशी टेलीकॉम कंपनी आहे जी फक्त 4जी नेटवर्क वरच चालते. 4जी सर्विस देण्या सोबतच कंपनीचे स्वस्त टॅरिफ प्लान इंडियन यूजर्सना तिच्याकडे खेचतात. आपल्या 4जी सर्विस मुळे अनेक रेकॉर्ड बनवणाऱ्या जियो ने पुन्हा एकदा आपल्या इंटरनेट स्पीड मुळे नवीन रेकॉर्ड बनवला आहे. जियो ने सर्वात वेगवान 4जी डाउनलोड स्पीड देऊन सर्व टेलीकॉम कंपन्यांना मागे टाकत पुन्हा एकदा देशात स्वतःला सिद्ध केले आहे.

भारतीय टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी (ट्राई) ने आपल्या ताज्या रिपोर्ट मध्ये ऑक्टोबर महिन्याचे आंकड़ शेयर केले आहेत ज्यात देशातील मोठ्या टेलीकॉम कंपन्यांच्या 4जी स्पीडचा अभ्यास करण्यात आला आहे. 4जी डाउनलोड स्पीड पाहता यात ​रिलायंस जियो ने सर्व कंपन्यांना मागे टाकत पहिला नंबर मिळवला आहे. ​ऑक्टोबर महिन्यात जियो ने सर्वात जास्त 22.3एमबीपीएस चा 4जी डाउनलोड स्पीड दिला आहे. विशेष म्हणजे हा स्पीड देशातील कोणत्याही कंपनी ने आतापर्यंत दिलेला सर्वात जलद डाउनलोड स्पीड आहे. याआधी पण जियो नेच सप्टेंबर महिन्यात 20.6एमबीपीएस चा सरासरी 4जी डाउनलोड स्पीड दिला होता.

इतर टेलीकॉम कंपन्यां पाहता जियो नंतर एयरटेल कंपनी या लिस्ट मध्ये दुसऱ्या नंबर वर आहे. याच काळात एयरटेल ने 9.5एमबीपीएस चा स्पीड देत दुसरा नंबर मिळवला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या नंबर मध्ये जियो ने एयरटेल च्या तुलनेत दुप्पट जास्त स्पीड दिला आहे. तसेच 6.4एमबीपीएस स्पीड देत वोडाफोन ने तिसरा आणि 6.4एमबीपीएस चा सरासरी 4जी डाउनलोड स्पीड देत आइडिया ने चौथा नंबर मिळवला आहे.

सरासरी 4जी अपलोड स्पीड पाहता ट्राई च्या रिपोर्टनुसार आपला रेकॉर्ड कायम ठेवत आइडिया पुन्हा एकदा पहिल्या नंबर वर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात आइडिया ने 5.9एमबीपीएस चा सरासरी अपलोड स्पीड देत पहिले स्थान मिळवले आहे. याच यादीत 5.1एमबीपीएस स्पीड सह रिलायंस जियो ने दुसरा नंबर मिळवला आहे. तसेच 4.8एमबीपीएस स्पीड सह वोडाफोन तिसऱ्या आणि 3.8एमबीपीएस स्पीड सह एयरटेल चौथ्या क्रमांकावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here