आयक्यूने 2 महिन्यांपूर्वी आपल्या iQOO Neo 9S Pro स्मार्टफोनला लाँच केले होते. तसेच, आता iQOO Neo 9S Pro+ व्हेरिएंट सादर होणार आहे. हा येत्या 11 जुलैला सादर होऊ शकतो. तसेच याला सर्वप्रथम होम मार्केट चीनमध्ये आणले जाईल. त्यानंतर इतर बाजारांमध्ये पण एंट्री दिली जाऊ शकते. परंतु अजून लाँचमध्ये काही वेळ आहे याआधी डिव्हाईसचे प्रमुख स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. ज्याची माहिती तुम्ही या पोस्टमध्ये पाहू शकता.
iQOO Neo 9S Pro+ चे स्पेसिफिकेशन
- iQOO Neo 9S Pro+ बाबत आज ब्रँड प्रेजिडेंट जिया जिंगडोंगने वीबोवर प्रमुख माहिती सांगितली आहे.
- iQOO Neo 9S Pro Plus मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट असेल. तसेच चांगल्या गेमिंग अनुभवसाठी ब्रँडने Q1 ग्राफिक्स चिप लावली आहे.
- बॅटरी लाईफ पाहता iQOO Neo 9S Pro+ मध्ये 5,500mAh ची बॅटरी असेल. याला चार्ज करण्यासाठी 120W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.
- कॅमेरा फिचर्स पाहता iQOO Neo 9S Pro+ मध्ये OIS टेक्नॉलॉजीसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 50 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेन्स लावली जाईल.
- ब्रँडनुसार डिव्हाईस 7.99 मिमी पातळ असेल. यात ओरिजिनओएस 4.0 आधारित अँड्रॉईड 14 दिले जाईल.
- सुरक्षेसाठी iQOO Neo 9S Pro+ कंपनीचा पहिला फ्लॅगशिप फोन असेल ज्यात अल्ट्रासोनिक इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.
iQOO Neo9S Pro चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: पूर्व मॉडेल iQOO Neo9S Pro मध्ये 6.78-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले आहे. यावर 1260 x 2800 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.
- प्रोसेसर: परफॉरमेंससाठी फोनमध्ये MediaTek Dimensity 9300+ प्रोसेसर, Q1 चिप आणि 6K VC लिक्विड कूलिंग सिस्टम मिळतो.
- स्टोरेज: यात 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.0 इंटरनल स्टोरेज आहे.
- कॅमेरा: iQOO Neo9S Pro मध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच, रिअर पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा Sony IMX920 प्रायमरी सेन्सर आणि 50MP चा अल्ट्रावाईड लेन्स मिळते.
- बॅटरी: iQOO Neo9S Pro मध्ये 5,160mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.















