आयक्यूने आपला iQOO Neo 9S Pro स्मार्टफोन गेल्या महिन्यात घरगुती बाजारात लाँच केला होता. त्याचवेळी आता त्याचे अपग्रेड व्हर्जन iQOO Neo 9S Pro+ आणले जाऊ शकते. मात्र ब्रँडकडून अद्याप याची कोणतीही घोषणा झालेली नाही. तरी, याआधी या उपकरणाने एमआयआयटी सर्टिफिकेशन साईटवर आपली उपस्थिती नोंदवली आहे. त्यामुळे हा मोबाईल लवकरच येण्याची शक्यता बळावली आहे. चला आता पुढे याच्या नवीनतम सूची आणि संभाव्य फिचर्सबद्दल अधिक तपशीलवार माहिती घेऊया.
iQOO Neo 9s Pro+ एमआयआयटी सूची
- आयक्यूचा नवीन स्मार्टफोन मॉडेल क्रमांक V2403A सह एमआयआयटी (उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय) सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आला आहे. ज्याला iQOO Neo 9s Pro+ मानले जात आहे.
- iQOO Neo 9s Pro+ च्या एमआयआयटी सूचीमधील मॉडेल क्रमांकाच्या व्यतिरिक्त यात 5G सपोर्ट असेल, असे सांगण्यात आले आहे.
- ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत या मोबाईलमध्ये Android 14 मिळणार असल्याचे समोर आले आहे.
- आम्ही तुम्हाला सांगतो या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर असे दिसून येत आहे की, हा नवीन मोबाईल पुढील महिन्यात जुलैमध्ये चीनच्या देशांतर्गत बाजारात येऊ शकतो.
iQOO Neo 9s Pro+ चे स्पेसिफिकेशन (लीक)
- डिस्प्ले: iQOO Neo 9s Pro+ मध्ये वापरकर्त्यांना 6.78 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्यावर 1.5K पिक्सेल रिझोल्यूशन आणि 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
- चिपसेट: फोनच्या प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास लीकनुसार, हा ब्रँड स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट वापरू शकतो. म्हणजेच हा मोबाईल परफॉर्मंसच्या बाबतीत मजबूत असेल.
- स्टोरेज: डेटा स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत LDDR5x RAM + 1TB पर्यंत UFS 4.0 ईंटरनल स्टोरेज असल्याचे समोर आले आहे.
- कॅमेरा: कॅमेरा फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी आणि 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याच वेळी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा लेन्स अपेक्षित आहे
- बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, या स्मार्टफोन मध्ये 5160एमएएच ची मोठी बॅटरी असू शकते. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 120 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.
- ओएस: ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, iQOO Neo 9s Pro+ या फोनला Android 14 सह आणला जाऊ शकतो.