जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कारमध्ये सचिन तेंडुलकर; Mahindra च्या तीन Electric Cars आल्या जगासमोर

Highlights

  • महिंद्रा ईव्ही फॅशन फेस्टिवलमध्ये सादर झाल्या तीन इलेक्ट्रिक कार.
  • BE आणि XUV.e सह बटिस्टा हायपर कार सादर
  • INGLO प्लॅटफॉर्मवर तयार झाले आहेत XUV.e आणि BE मॉडेल.

भारतीय इलेक्ट्रिक कार्स मार्केटमध्ये खळबळ उडवण्यासाठी Mahindra नं आपल्या तीन नवीन इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहात. महिंद्रा अँड महिंद्रानं हैद्राबादमध्ये आयोजित महिंद्रा ईव्ही फॅशन फेस्टिवल दरम्यान भारतात आपल्या इलेक्ट्रिक-एसयूव्हीची ‘बॉर्न इलेक्ट्रिक’ रेंज शोकेस केली. या रेंजमध्ये कंपनीनं तीन Electric Cars एक्सयूवी.ई आणि बीई.05 एसयूव्हीसह महिंद्राच्या मालकीच्या इटालियन लग्जरी कार कंपनी पिनिनफेरिनाकडून बटिस्टा हायपर कार सादर केली.

जगातील सर्वात फास्ट इलेक्ट्रिक कारमध्ये सचिन

महिंद्र द्वारे आयोजित ईव्ही फेस्टिवल दरम्यान दोन नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही आणि एक हायपर कार सादर केली आहे. कंपनीनं एक्सयूवी.ई9 आणि बीई.05 एसयूव्ही वरून पडदा उठवला आहे. महिंद्राच्या मालकीच्या इटालियन लग्जरी कार कंपनी पिनिनफेरिनानं बटिस्टा हायपर देखील शोकेस केली. जी जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार असून या कारमधून माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं राइडही घेतली. हे देखील वाचा: मोफत मिळवा 12GB डेटा; Jio युजर्ससाठी धमाकेदार ऑफर

Mahindra XUV.e9

बॉर्न इलेक्ट्रिक सीरीजमध्ये महिंद्रानं एक्सयूवी.ई9 सादर केली. XUV.e9 चे प्रोडक्शन सर्वप्रथम सुरु होऊ शकते, परंतु अधिकृत लाँच डेट समजली नाही. डिजाइन पाहता यात सेबर टूथ एलईडी डीआरएलमध्ये मध्यभागी एक रनिंग यूनिट देखील आहे जो दोन्ही टोकांना जोडतो. तसेच हा एलईडी हेडलॅम्प यूनिट हाय आणि लो बीमसाठी दोन भागांमध्ये विभागण्यात आला आहे. तसेच फ्रंटला ग्रिल आणि एयर कर्टन ओपनिंग देखील माही. ड्रॅग कपॅसिटीसाठी चाकांवर प्लास्टिक पॅनल देण्यात आले आहेत. यात पारंपरिक ब्लॅक-आउट ओआरवीएम देण्यात आले आहेत, तसेच एक्सयूवी400 प्रमाणे गोल्ड अ‍ॅक्सेंट देखील मिळतो.

Mahindra BE.05

BE.05 बद्दल बोलायचं तर हीचा लुक खूप फ्यूचरिस्टिक वाटतो. ई-कारच्या फ्रंटला एलईडी डीआरएलसाठी सेबर टूथ डिजाइन आहे. तर फ्रंट बंपरच्या बॉटमला एक एलईडी पॅनल आहे जो लाइट पॅटर्न बनवतो, त्याचबरोबर .05 ची बॅजिंग मिळते. कारच्या साइडला स्क्वायर-ऑफ व्हील आर्चच्या चारही बाजूंना प्लास्टिक क्लॅडिंग आहे. तसेच यात मिरर ऐवजी फक्त एक कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: खास बजेट युजर्ससाठी येतोय Vivo Y56 5G फोन; लीक झाले स्पेसिफिकेशन्स

Pininfarina Battista

या इव्हेंटमध्ये कंपनीनं आपल्या मालकीच्या पिनिनफेरिना कंपनीकडून बटिस्टा हायपर कार सादर केली. जिची सर्वात मोठी खासियत म्हणजे ही 0 ते 100 किलोमीटरचा वेग गाठण्यासाठी फक्त 1.86 सेकंड घेते. यामुळे हिला सर्वात फास्ट इलेक्ट्रिक कार म्हणता येईल. याआधी हा रेकॉर्ड रिमॅक नेवेराच्या नावे होता जी 1.95 सेकंदात 0 ते 100 किलोमीटरचा वेग गाठू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here