लाँचपूर्वीच लीक झाली iQOO Z7 Pro 5G ची किंमत; भारतीय स्पेसिफिकेशन्सचा देखील खुलासा

Highlights

  • ह्या फोनची प्रारंभिक किंमत 25,000 रुपयांच्या आसपास असेल
  • हा डिवाइस OnePlus Nord CE 3 आणि Redmi Note 12 Pro 5G ला टक्कर देईल.
  • फोनमध्ये 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते

iQOO Z7 Pro 5G फोन भारतात लाँच होण्यासाठी तयार होत आहे. काही दिवसांपूर्वी आयकू इंडियाचे अधिकारी निपुण मार्या ह्यांनी आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून हा आगामी स्मार्टफोन टीज केला होता. कंपनीनं अद्याप फोनची लाँच डेट घोषित केली नाही परंतु एका ताज्या लीकनुसार बाजारात येण्यापूर्वीच आयकू झेड7 प्रो 5जी ची भारतीय किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत, ही माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

iQOO Z7 Pro 5G ची भारतीय किंमत (लीक)

टिपस्टर पारस गुगलानीनं आयकू झेड7 प्रो 5जी फोनची किंमत ट्वीटर हँडलवरून शेयर केली आहे. टिपस्टरनुसार ह्या फोनची प्रारंभिक किंमत 25,000 रुपयांच्या आसपास असेल तसेच सर्वात मोठ्या व्हेरिएंटची किंमत 30,000 रुपये पर्यंत जाईल. लीकनुसार iQOO Z7 Pro 5G बाजारात त्या प्राइस सेग्मेंटमध्ये आणलं जाईल ज्यात आधीपासूनच OnePlus Nord CE 3 आणि Redmi Note 12 Pro 5G आहे.

iQOO Z7 Pro 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.78″ 120Hz AMOLED display
  • MediaTek Dimensity 7200
  • 12GB RAM + 256GB storage
  • 64MP Rear + 16MP Front Camera
  • 66W fast charging
  • 4,600mAh battery
  • स्क्रीन : लीकनुसार आयकू झेड7 प्रो 5जी फोन 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल. कंपनीनं आधीच सांगितलं आहे की फोनमध्ये कर्व्ड पंच-होल डिस्प्ले मिळेल.
  • प्रोसेसर : Z7 Pro 5G अँड्रॉइड 13 आधारित फनटचओएस 13 सह लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार प्रोसेसिंगसाठी ह्या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7200 ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो.
  • मेमरी : लीकनुसार नवीन आयकू फोन भारतात दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये सादर होऊ शकतो. तसेच बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम दिला जाऊ शकते तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12जीबी मिळू शकतो. स्टोरेजसाठी 128जीबी मेमरी आणि 256जीबी मेमरी ह्या फोनमध्ये दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ह्याच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स मिळू शकते. तसेच फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी iQOO Z7 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 4,600एमएएचची बॅटरी असल्याचं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. ह्या फोनमध्ये 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here