12 मार्चला भारतात येणार आहे iQOO Z9 5G, येथे होईल सेल

Highlights

  • iQOO Z9 5G अ‍ॅमेझॉनवर विकला जाईल आहे.
  • फोनमध्ये Dimensity 7200 प्रोसेसर असणार आहे.
  • यात Sony IMX882 OIS कॅमेरा सेन्सर मिळेल


iQOO ने गेल्या आठवड्यात 22 फेब्रुवारीला भारतात iQOO Neo 9 Pro ची घोषणा केली होती. तसेच, या फोनच्या लाँचनंतर कंपनी अजून एक नवीन फोनला भारतात आणण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनी खूप दिवसांपासून अपकमिंग स्मार्टफोन iQOO Z9 5G च्या लाँचला टीज करत आहे. तसेच, फोनचे लँडिंग पेज गेल्या आठवड्यापासून अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे, परतुं कंपनीने याच्या लाँचच्या तारखेचा खुलासा केलेला नाही. तसेच, आज, ब्रँडने एका अधिकृतपणे iQOO Z9 5G लाँचवरून पडदा उठविला आहे.

या दिवशी लाँच होईल iQOO Z9 5G

कंपनीने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर या गोष्टीची माहिती दिली आहे की iQOO Z9 5G भारतात 12 मार्चला लाँच केला जाईल. तसेच ब्रँडने ही पण पुष्टी केली आहे की iQOO Z9 5G आपल्या सेगमेंटमध्ये OIS-सक्षम Sony IMX882 50-मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा असलेला पहिला फोन असेल.
तसेच कंपनीने पुष्टी केली आहे की फोन मीडियाटेक डायमेंशन 7200 SoC सह आपल्या नवीन Z-सीरीज स्मार्टफोनला आणणार आहे. तसेच, याची सेल ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून केली जाईल.

iQOO Z9 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: iQOO Z9 5G फोनमध्ये 6.67-इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 1800 निट्स पीक ब्राईटनेस आणि 300Hz ​टच सॅम्पलिंग रेट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: ब्रँडने कंफर्म केले आहे की iQOO Z9 MediaTek Dimensity 7200 चिपसह लाँच केला जाईल.
  • कॅमेरा: फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा LED फ्लॅशसह मिळण्याची गोष्ट पण कंफर्म आहे ज्यात प्रायमरी कॅमेऱ्यात Sony IMX882 OIS कॅमेरा सेन्सर असेल.
  • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत सांगण्यात आले आहे की नवीन iQOO Z9 5G 6,000mAh ची बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.
  • मेमरी: डेटा स्टोरेज पाहता iQOO Z9 मध्ये 12जीबी पर्यंत रॅम आणि 512जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
  • ओएस: iQOO Z9 स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टीम पाहायला मिळू शकते.

iQOO Z9 5G किंमत आणि कलर (संभाव्य)

संभावना आहे की हा स्मार्टफोन भारतात निळ्या आणि हिरव्या रंगात येऊ शकतो. तसेच किंमत पाहता बोलले जात आहे की स्मार्टफोनला 20,000 रुपयांपेक्षा कमी सुरुवाती किंमतीत लाँच केले जाऊ शकते. परतुं, याची किंमत आणि पूर्ण स्पेसिफिकेशन्सचा खुलासा 12 मार्चला ऑफिशियल केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here