तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येऊ शकतो Samsung Galaxy A14 5G फोन; भारतीय लाँचपूर्वीच किंमत लीक

Samsung Galaxy A14 5G फोन येत्या 18 जानेवारीला भारतात लाँच होऊ शकतो. या मोबाइल सोबतच कंपनी Samsung Galaxy A23 5G देखील बाजारात सादर करू शकते. हे दोन्ही मिडरेंज स्मार्टफोन असतील आणि पुढील आठड्यात भारतीय बाजारात दाखल होऊ शकतात. गॅलेक्सी ए14 5जी ग्लोबल मार्केटमध्ये आधीच ऑफिशियल झाला आहे त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन्स सर्वश्रुत आहेत. तसेच आता एका लीकमध्ये भारतीय लाँचपूर्वीच Galaxy A14 5G ची भारतीय किंमत समोर आली आहे.

Samsung Galaxy A14 5G India price

लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोन भारतात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येऊ शकतो. फोनच्या बेस मॉडेलमध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते ज्याची किंमत 16,499 रुपये असू शकते. त्याचप्रमाणे 4जीबी+128जीबी व्हेरिएंटची किंमत 19,499 रुपये तर 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंटची प्राइस 21,999 रुपये असू शकते. या सॅमसंग फोनची विक्री लाँचनंतर काही दिवसांनी सुरु होऊ शकते. भारतात हा फोन नुकत्याच लाँच झालेल्या रेडमी नोट 12 आणि रियलमी 10 प्रो सीरिजला टक्कर देऊ शकतो असं लीक प्राइसवरून वाटते आहे. हे देखील वाचा: How To Verify Aadhaar Card: आधार कार्ड बनवताना तुमची फसवणूक तर झाली नाही ना? दोन मिनिटांत करा व्हेरिफाय

Samsung Galaxy A14 5G च्या ग्लोबल मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स/h2>

  • 6.6″ FHD+ 90Hz डिस्प्ले
  • 50MP Dual Rear Camera
  • MediaTek Dimensity 700
  • 15W 5,000mAh battery

सॅमसंग गॅलेक्सी ए14 5जी फोनमध्ये 1080 x 2408 रिजोल्यूशन असलेला 6.6 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित वनयुआय 5 वर चालतो. तर प्रोसेसिंगसाठी कंपनीनं 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटचा वापर केला आहे.

Samsung Galaxy A14 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा सॅमसंग 5जी फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: Jio युजर्ससाठी बेस्ट 5G प्लॅन! फक्त 61 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतोय अनलिमिटेड 5G डेटा

हा एक ड्युअल सिम फोन आहे ज्यात 5जी व 4जी दोन्ही वापरता येईल. 3.5एमएम जॅक आणि एनएफसी सोबतच स्मार्टफोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी गॅलेक्सी ए14 5जी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तर पावर बॅकअपसाठी यात 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here