फक्त 5,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला हा स्वस्त अँड्रॉइड ‘गो’ स्मार्टफोन, Xiaomi – Realme ला देईल टक्कर

टेक ब्रँड आयटेलने आज भारतीय बाजारातील लो बजेट सेग्मेंट मध्ये आपला नवीन दावेदार सादर केला आहे. कंपनीने नवीन मोबाईल फोन भारतात लॉन्च केला आहे जो itel A47 नावाने मार्केट मध्ये आला आहे. आयटेल ए47 कंपनीने फक्त 5,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो येत्या 5 फेब्रुवारी पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. आयटेल ए47 या बजेट मधील चांगल्या फीचर्स आणि लुकसह येतो.

लुक व डिजाईन

itel A47 ब्रँडचा एंट्री लेवल डिवायस आहे जो रेग्यूलर नॉचलेस डिजाईन वर लॉन्च झाला आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर रुंद बेजल्स असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा आणि सॉफ्ट फ्लॅशसह स्पीकर आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. बॅक पॅनलवर मध्यभागी रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे तर खाली डावीकडे स्पीकर देण्यात आला आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे तसेच खालच्या बाजूला माइक्रो यूएसबी आहे.

फीचर आणि स्पेसिफिकेशन्स

itel A47 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1440 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो आयपीएस पॅनलवर बनला आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा 2.5डी ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. आयटेल ए47 अँड्रॉइड 9 पाईच्या ‘गो’ एडिशन वर लॉन्च केला गेला आहे जो 1.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या क्वॉड-कोर प्रोसेसर वर चालतो.

आयटेल ए47 ने भारतीय बाजारात 2 जीबी रॅमसह आला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. अँड्रॉइड गो एडिशन असल्यामुळे कमी रॅम व स्टोरेज असूनही फोन स्मूद आणि लॅग-फ्री परफॉर्म करतो. या फोन मध्ये गुगल गो सर्विसेज ऍक्सेस केल्या जाऊ शकतात ज्या इंटरनेटचा वापर कमी करतात तसेच बॅटरी पण खूप कमी वापरतात.

हे देखील वाचा : फक्त 3999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आईटेलचा एंडरॉयड गो आधारित 4G फोन itel A25

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता itel A47 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 5 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर एआय लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये सॉफ्ट फ्लॅशसह 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

itel A47 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी जिथे बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 3,020एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. आयटेल ए47 5,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो Cosmic Purple आणि Ice Lake Blue कलर वेरिएंट मध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here