Categories: बातम्या

डुअल कॅमेरा आणि बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च झाला आईटेल ए62, किंमत फक्त 7,499 रुपये

टेक कंपनी आईटेल ने आज भारतीय बाजारात आपला पहिला डुअल रियर कॅमेरा वाला स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे.  आईटेल ने ए62 स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये आणला आहे. कंपनी ने या फोन ची किंमत 7,499 रुपये ठेवली आहे जो आॅनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

आईटेल ए62 ची सर्वात मोठी यूएसपी फोन चा डुअल रियर कॅमेरा आहे. हा कंपनीचा पहिला डुअल रियर कॅमेरा वाला फोन आहे जो भारतात लॉन्च करण्यात आला आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशिया सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 5.65-इंचाचा फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे जो एचडी+ रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे, सोबतच 1.3गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर मीडियाटेक एमटी6739डब्ल्यूए चिपसेट वर चालतो.

कंपनी ने फोन मध्ये 2जीबी रॅम दिला आहे. फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चा प्राइमरी आणि सेकेंडरी वीजीए कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

आईटेल ए62 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात ओटीजी सपोर्ट वाली 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. आईटेल ए62 स्मार्टफोन ब्लॅक, शँपेन आणि रेड कलर वेरिएंट मध्ये 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Published by
Siddhesh Jadhav