Jio घेऊन येत आहे अत्यंत स्वस्त 4जी फोन; Jio Bharat V1 चा झाला खुलासा

जियो फोन युजर्ससाठी मोठी बातमी आली आहे. कंपनी आपला Ji 4G Feature Phone पुन्हा घेऊन येत आहे. हा फोन लवकरच रिटेल स्टोर मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे यावेळी फोनच्या नावात बदल करण्यात आला आहे. तसेच जुन्या फोनच्या तुलनेत किंमतही कमी असू शकते. नवीन फोनच्या फोटोमध्ये छोटी स्क्रीन स्पष्ट दिसत आहे.

आलेल्या बातमीनुसार, कंपनी यावेळी Jio Bharat V1 4G नावाचा स्वस्त फीचर फोन सादर करणार आहे. ह्या फोनबद्दल इंटरनेटवर काही बातम्या आल्या आहेत. तसेच 91मोबाइल्सला देखील मुंबईच्या एका रिटेलरकडून ह्याची माहिती मिळाली आहे. हा जियोचा स्वस्त 4जी फीचर फोनच आहे, परंतु ह्यात काही अपग्रेड देखील तुम्हाला दिसतील.

कसा असेल Jio Bharat V1 4G फोन

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की Jio Bharat V1 4G दिसायला जुन्या जियो फोनसारखाच आहे, परंतु आधी फ्रंटला तुम्हाला जियोचा लोगो होतो त्याऐवजी यावेळी कंपनीनं ‘भारत’ लिहलं आहे म्हणजे की यावेळी संपूर्ण ब्रँडिंग बदलली जाईल.

फोनची स्क्रीन आधीच्या तुलनेत छोटी दिसत आहे. तसेच स्क्रीनवर जियो सावन आणि जियो सिनेमासह आणखी एक लोगो दिसत आहे. त्यामुळे फोनमध्ये जियो अ‍ॅप्सचा सपोर्ट असेल, हे स्पष्ट झालं आहे. फोनमध्ये कीपॅडची जागा आधीप्रमाणे आहे कोणताही खास अपग्रेड दिसत नाही.

रिटेलरनं दिलेली माहिती

याबाबत आम्हाला जियोच्या एका रिटेलरनं सांगितलं की कंपनी मोठी योजना बनवत आहे आणि हा नंतर 5जी मध्ये अपग्रेड केला जाऊ शकतो. परंतु आमच्या माहितीनुसार, 5जी नेटवर्क सपोर्टसाठी चिपसेट 5जी सपोर्टेड असणं आवश्यक आहे जे ह्या फोनमध्ये दिसत नाही. परंतु एक बाब अशी दिसली आहे की फोनच्या नावात व्ही1 आहे. त्यामुळे हा भारत फोन व्हर्जन 1 आहे असं देखील म्हणता येईल. त्यामुळे कंपनी भारत फोन व्हर्जन 2 किंवा व्हर्जन 3 द्वारे 5जी फीचर फोन लाँच केला जाऊ शकतो, असा अंदाज आपण लावू शकतो.

जियो भारत फोन वी1 4जी च्या किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती मात्र मिळाली नाही. परंतु आशा आहे की जुन्या फोनच्या तुलनेत हा कमी किंमतीत उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here