Jio चा मास्टर स्ट्रोक, लॉन्च केला 251 रुपयांचा क्रिकेट सीजन डेटा पॅक

जर तुम्ही पण क्रिकेटचे चाहते असाल आणि तुम्हाला तुमच्या फोन वर वर्ल्ड कप 2019 न बघू शकण्याची दुःख असेल तर रिलायंस जियो ने तुमच्यासाठी मोठी भेट दिली आहे. रिलायंस जियो ने क्रिकेट विश्व कप 2019 च्या निमित्ताने सिक्सर पॅक सादर केला आहे. जियोच्या या ऑफरचा फायदा करोडो ग्राहकांना होईल.

कंपनीने क्रिकेट विश्व कप 2019 साठी खास पॅक पण सादर केला आहे ज्याची किंमत 251 रुपये आहे. या पॅकचा फायदा असा असेल कि जर तुमच्या फोनचा पॅक संपला तरीही तुम्ही मॅच लाइव बघू शकाल. या पॅकची वैधता 51 दिवस आहे आणि या प्लान मध्ये एकूण 102 जीबी डेटा मिळेल.

जियो ने याआधी आईपीएल आणि सर्व बीसीसीआई मॅचेसचे लाइव प्रसारण पण आपल्या यूजर्ससाठी उपलब्ध केले आहे. जियो ने या ऑफर साठी हॉटस्टार सोबत भागीदारी केली आहे आणि याच भागेदारी अंतर्गत सर्व ग्राहक मोफत वर्ल्ड कप 2019 च्या सर्व मॅचेस आपल्या फोन वर लाइव बघू शकतील.

खास बाब अशी कि जियोची हि ऑफर पूर्णपणे फ्री आहे. त्यामुळे जर तुम्ही एक जियो यूजर असाल तर तुम्ही तुमच्या फोन मध्ये सहज मोफत क्रिकेट विश्व कप 2019 च्या सर्व मॅचेस लाइव बघू शकाल. तुम्ही जियो टीवी ऍप किंवा हॉटस्टार ऍप वर फ्री मध्ये मॅच बघू शकाल. पण तुमच्या फोन मध्ये जियोचे सिम कार्ड असणे आवश्यक आहे. सोबतच जियो ग्राहक जियोचा लोकप्रिय जियो क्रिकेट प्ले माईजियो ऍप वर खेळू शकता आणि गिफ्ट पण जिंकू शकता.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here