जियो करणार आहे धमाका, 600 रुपयांमध्ये देईल महिनाभर लँडलाइन, ब्रॉडबॅंड आणि टीवीचा कॉम्बो

रिलायंस जियो ने टेलीकॉम सर्विस मध्ये आपली ओळख निर्माण केल्यानंतर ब्रॉडबॅंड क्षेत्रात पण नाव करण्यासाठी पण कंबर बांधली आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी ‘जियो गीगाफाइबर’ लॉन्च केली होती. जियोची गीगाफाइबर सर्विस सध्या फक्त रिलांयस कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी एका मीडिया रिपोर्ट मध्ये जियो गीगाफाइबरच्या नवीन प्लान ‘ट्रिपल प्ले’ ची माहिती समोर आली होती आणि आता एका रिपोर्टनुसार, रिलायंस जियोचा लँडलाइन-ब्रॉडबॅंड-टीवी पॅकेज 600 रुपये प्रतिमहीना दराने उपलब्ध होईल.

विशेष म्हणजे जियोने अजूनतरी गीगाफाइबरच्या पब्लिक प्लान्सचे डिटेल सार्वजनिक केले नाहीत. समोर येत असलेल्या नवीन माहितीनुसार रिलायंस जियोची GigaFiber ब्रॉडबॅंड सर्विस दुसऱ्या सर्विसेज म्हणजे टीवी आणि लँडलाइन सह येऊ शकते. तसेच जियो 1,000 रुपयांपर्यंत स्मार्ट होम सॉल्यूशन्स पण देईल.

अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि कंपनी जियो गीगाफाइबरची टेस्टिंग करत होती आणि आता असे बोलले जात आहे कि लवकरच हि कमर्शल यूज साठी रोलआउट केली जाईल. जियो गीगाफाइबरची टक्कर बीएसएनएल च्या एफटीटीएच सर्विस सोबत होईल.

हे देखील वाचा: Redmi Y3 आणि Redmi 7 भारतात लॉन्च, Xiaomi पुन्हा करणार नवीन रेकॉर्ड

समोर आलेल्या माहितीनुसार यूजर्स 600 रुपयांच्या प्लान व्यतिरिक्त 1,000 रुपये देऊन यांच्या काही सर्विस वापरता येतील. सोबत यूजर्स जियो गीगाफाइबरच्या स्मार्ट होम नेटवर्कशी आपले 40 डिवाइसेज पण कनेक्ट करू शकाल.

रिलायंस जियोच्या ब्रॉडबॅंड सर्विस जियो गीगाफाइबर बद्दल बोलायचे तर हि एफटीटीएच म्हणजे फाइबर टू दी होम सर्विस आहे. जियो हि सर्विस देशात सादर झाली आहे पण हि अजून टेस्टिंग फेज मध्ये आहे. जियोच्या कर्मचाऱ्यांना जियो गीगाफाइबरचे कनेक्शन्स देण्यात आले आहेत ज्यातून गीगाफाइबरचा स्पीड व क्षमता तपासता येईल.

हे देखील वाचा: एक्सक्लूसिव : Vivo U सीरीज येत आहे भारतात, किंमत होईल 6,490 रुपयांपासून सुरु

जियोचा दावा आहे कि जियो गीगाफाइबरची ट्रायल कंपनीने 10,000 पेक्षा जास्त शहरांत केली आहे आणि आशा आहे कि येत्या काळात सामान्य माणसांसाठी पण हि सर्विस उपलब्ध होईल. विशेष म्हणजे रिलायंस जियोने जियो गीगाफाइबरचे रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. माय जियो ऍप सोबत कंपनीच्या वेबसाइट वर जाऊन रजिस्ट्रर करता येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here