रिलायंस जियो ने आशा वेळी टेलीकॉम जगात एंट्री केली होती जेव्हा मोबाईल प्लान्स तर महाग होतेच आणि इंटरनेट साठी पण खुप पैसे मोजावे लागत होते वरून हाई स्पीड पण मिळत नसे. जियो ने 4जी सर्विस देऊन देशातील इंटरनेट बाजारात उत्साह आणला आहे. आज खुपच कमी किंमतीत हाई स्पीड 4जी इंटरनेट मिळते. 4जी सिम नंतर, वाईफाई हॉटस्पॉट आणि 4जी फोन घेऊन येणार्या जियो ने आता ‘एआई’ म्हणजे आर्टिफिशल इंटेलीजेंस च्या क्षेत्रात नवीन सुरवात केली आहे. जियो ने ‘जियो इंटरेक्ट’ सर्विस लॉन्च केली आहे जिच्या माध्यमातून बॉलीवुड सेलिब्रिटी शी लाईव वीडियो चॅट आणि आॅटो लर्निंग केली जाऊ शकते.
जियो इंटरेक्ट सादर करून रिलायंस जियो जगातील पहिली अशी टेलीकॉम कंपनी बनली आहे जिने एआई बेस्ड ब्रॅन्ड इंगेजमेंट प्लेटफॉर्म लॉन्च केला आहे. जियो इंटरेक्ट एक असा एआई आधारित डिजीटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करवून देते ज्यात यूजर जियो इंटरेक्ट शी बोलू शकतो. अॅप्पल च्या सीरी प्रमाणे हा यूजर चे बोलणे ऐकतो आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो. जियो इंटरेक्ट ची क्षमता मर्यादित नाही. हा आॅटो लर्निंग करण्यात सक्षम आहे आणि स्वतःच नवीन आणि आवश्यक गोष्टी शिकून यूजर च्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतो.
जियो इंटरेक्ट मध्ये लाईव वीडियो कॉल चे फीचर पण दिले गेले आहे. हे फीचर काही प्रमाणात फेसबुक आणि इंस्टाग्राम च्या लाईव वीडियो फीचर प्रमाणे चालते. जियो इंटरेक्ट या नवीन सर्विस ची सुरवात बॉलीवुड चे शहंशाह अमिताभ बच्चन सोबत मिळून करणार आहे, अमिताभ लाईव वीडियो च्या माध्यमातून आपल्या फॅन्स सोबत इंटरेक्ट करतील. त्याचबरोबर जियो इंटरेक्ट मध्ये वीडियो कॉल सेंटर्स, वीडियो कॅटलॉग आणि वर्चुअल शोरूम्स इत्यादि पण लवकरच येतील.
जियो इंटरेक्ट कसे वापरावे :
जियो इंटरेक्ट साठी सर्वात आधी माय जियो अॅप डाउनलोड करावा लागेल.
माय जियो अॅप मध्ये जियो इंटरेक्ट चे आॅइकन देण्यात आले आहे, यावर क्लिक करा.
जियो इंटरेक्ट मध्ये तुम्हाला वीडियो कॉल चे बटन दिसेल, त्यावर क्लिक करताच बच्चन साहेबांना कॉल लागेल.
अमिताभ बच्चन यांना वीडियो कॉल करताना तुम्हाला तुमच्या फोन चा फ्रंट कॅमेरा आॅन ठेवावा लागेल.
शेयर बटन वर क्लिक करून तुम्ही या अॅप लिंक तुमच्या मित्रांना पाठवू शकता.















