जियोच्या नावे अजून एक विक्रम, जियोफोन ठरला सर्वात जास्त विकला जाणारा फीचर फोन, सॅमसंग-नोकिया ला टाकले मागे

रिलायंस जियो ने काही दिवसांपूर्वी कंपनी च्या वार्षिक बैठकीतून कंपनी चा नवीन 4जी फीचर फोन सादर केला होता. मुकेश अंबानी ने जियो चा दुसरा 4जी फीचर फोन जियोफोन 2 सादर केला होता जो 15 ऑगस्ट पासून देशभरात सेल साठी उपलब्ध होईल. जियोफोन 2 किती यशस्वी होईल यासाठी वाट बघावी लागेल पण कंपनीचा पहिला 4जी फीचर फोन म्हणजे जियोफोन नव नवीन रेकॉर्ड बनवत आहे. एका ताज्या रिपोर्ट मधून समोर आले आहे की पुन्हा एकदा देशातील फीचर फोन मार्केट मध्ये जियोफोन ने टॉप केले आहे. पण फक्त टॉप केले नाही तर जियोफोन ने 47 टक्के मार्केट शेयर सह भारतातील जवळपास अर्ध्या फीचर फोन बाजारावर राज्य केले आहे.

प्रसिद्ध रिसर्च फर्म काउंटर प्वाइंट ने आपल्या रिपोर्ट मध्ये खुलासा केला आहे की जियोफोन पुन्हा एकदा भारतातील सर्वांत जास्त विकला जाणारा फीचर फोन बनला आहे. काउंटरप्वांट चा हा रिपोर्ट साल 2018 च्या दुसर्‍या तिमाहीचा आहे. या रिसर्च रिपोर्ट नुसार एकट्या जियोफोन ने देशातील 47 टक्के फीचर फोन कवर करत रेकॉर्ड सेल केला आहे. या लिस्ट मध्ये जियो नंतर सॅमसंग दुसऱ्या आणि नोकिया तिसऱ्या नंबर वर आहे. याच काळात सॅमसंग कडे 9 टक्के मार्केट शेयर होता तर नोकिया ने भारतीय फीचर फोन बाजारात 7 टक्क्यांवर कब्जा केला आहे.

स्पष्ट दिसत आहे की फीचर फोन च्या बाजारात सॅमसंग आणि नोकिया सारखे ब्रांड जियो पेक्षा खुप मागे राहिलेत. या दोन्ही ब्रांड्स बद्दल बोलायचे तर साल 2017 च्या दुसर्‍या तिमाहीत सॅमसंग कडे 27 टक्के मार्केट शेयर होता जो कमी होऊन फक्त 9 टक्के उरला आहे. तसेच आज जो नोकिया कडे 8 टक्के मार्केट शेयर आहे तो गेल्यावर्षी फक्त 3 टक्के होता. स्पष्ट दिसतय की जियोफोन आल्यामुळे सर्वात मोठे नुकसान सॅमसंगला झाले आहे.

सॅमसंग ने सध्या इंडियन मार्केट मध्ये अनेक शानदार फीचर फोन सादर केले आहेत तर जियो ने फक्त 1 जियोफोन बाजारात आणला आहे. जियोफोन च्या या स्पीड ने सॅमसंग च्या फीचर फोन मार्केटला जोरदार झटका दिला आहे. विशेष म्हणजे काउंटरप्वाइंट च्या या रिपोर्ट मध्ये जून पर्यंतच्या सेल रेकॉर्ड करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी जियो मॉनसून हंगामा आॅफर सुरू झाली आहे ज्यात जुना फोन एक्सचेंज करून नवीन जियोफोन मिळू शकतो. त्यामुळे जियोफोन चा सेल पुन्हा एकदा जोरदार होऊ शकतो.

फीचर फोन बाजारात मागे राहिलेल्या सॅमसंग च्या फॅन्स साठी एक चांगली बातमी ही आहे की कांउटरप्वांइट ने आपला अजून एक रिपोर्ट पण सादर केला आहे ज्यात भारतीय स्मार्टफोन बाजारची माहिती आहे. या रिपोर्ट नुसार 2018 च्या दुसर्‍या तिमाहीत सॅमसंग सर्वात जास्त मार्केट शेयर्स वर कब्जा करत देशातील सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन ब्रांड बनला आहे. या लिस्ट मध्ये सॅमसंग ने शाओमी ला मागे टाकत पाहिले स्थान मिळवले आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here