Jio यूजर्सना झटका, आता या तीन प्लान्स मध्ये मिळेल कमी टॉक टाइम

देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी Reliance Jio अनेक दिवसांपासून आपले नवीन आणि शानदार प्लान ऑफर करत आहे. पण दुसरीकडे कंपनी चुपचाप आपल्या प्लान्स मधील लाभ पण कमी करत आहे. समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार जियोने आपल्या अंतरराष्ट्रीय सब्सक्राइबर डायलिंग (ISD) आणि अंतर्राष्ट्रीय रोमिंग (IR) प्रीपेड रीचार्ज वाउचर मध्ये मिळणारे फायदे कमी केले आहेत, ज्या बाबत कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही.

रिपोर्टनुसार या प्लान्स मध्ये हे बदल काही दिवसांपूर्वी झाले होते. कंपनीने आपल्या 501 रुपयांच्या आईएसडी रीचार्ज वाउचर सोबतच 1,101 रुपये आणि 1,201 रुपये आईआर पॅक मध्ये मिळणाऱ्या फायद्यांमध्ये बदल केला आहे. बदल केल्यांनतर Jio वेबसाइट वर हे प्लान दिसत आहेत. कंपनीने अजूनतरी 575 रुपये, 2,875 रुपये आणि 5,751 रुपयांच्या अनलिमिटेड IR पॅक मध्ये कोणताही बदल केला गेला नाही.

जियोच्या 501 रुपयांच्या ISD रीचार्ज बद्दल बोलायचे तर आता यूजर्सना 28 दिवसांच्या वैधतेसह 424.58 रुपयांचा टॉक टाइम मिळेल. याआधी या पॅक मध्ये 551 रुपयांचा टॉक टाइम मिळत होता. आता यूजर्सना 126.42 रुपये कमी टॉक टाइम दिला जात आहे.

Jio च्या 1,101 रुपये आणि 1,201 रुपयांच्या पॅक्सचे फायदे पण कमी करण्यात आले आहेत. Jio च्या अधिकृत वेबसाइट नुसार, 1,101 रुपयांच्या पॅक मध्ये आता 933.05 रुपयांचा आईआर यूसेज मिळेल, जो आधी 1,211 रुपये होता. तर 1,201 रुपयांच्या पॅक मध्ये आता 1,017.80 रुपयांचा आईआर यूसेज मिळेल, जो आधी 1,321 रुपये होता.

अलीकडेच टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (Trai) ने जुलै 2020 चा डेटा प्रसिद्ध केला आहे, ज्यात रिलायंस जियोच्या जुलै 2020 मध्ये 4G डाउनलोड स्पीड जून 2020 सारखा होता. रिलायंस जियोच्या 4G डाउनलोड स्पीड मध्ये जून आणि जुलै मध्ये कोणताही बदल झालेला नाही. कंपनी अजूनही 16.5Mbps स्पीड सह सर्वात पुढे आहे. तसेच वोडाफोनचा जुलै मध्ये 4G डाउनलोड स्पीड 8.3Mbps होता. तर एयरटेलचा 4G स्पीड जुलै मध्ये 7.3Mbps होता.

सोर्स

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here