जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया ने रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्यापासून यूजर्समध्ये संताप आहे. त्याचबरोबर या नाराजीचा थेट फायदा बीएसएनएल ला होताना दिसत आहे. वास्तविक, दूरसंचार वापरकर्ते परवडणारे प्लॅन शोधत आहेत आणि त्यांचा शोध बीएसएनएलवर संपलेला दिसत आहे. पण, देशातील नंबर 1 टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ पेक्षा बीएसएनएल रिचार्ज खरोखर स्वस्त आणि त्यासोबत अधिक फायदे मिळतात का? याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला या दोन्ही कंपन्यांच्या 12 महिन्यांची वैधता असणाऱ्या रिचार्ज प्लॅनची तुलना करून सांगणार आहोत. चला जाणून घेऊया तुमच्यासाठी वर्षभर वैधता असलेला कोणता रिचार्ज प्लॅन सर्वोत्तम असेल?
BSNL चा 2395 रुपयांचा प्लॅन
प्लॅन | फायदे | वैधता |
2,395 रुपये | रोज 2GB, अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, रोज 100 SMS | 395 दिवस |
बीएसएनएल चा 2395 रुपयांचा प्लॅन
- कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन 395 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा पॅक अमर्यादित डेटासह लोकल/एसटीडी कॉलवर अमर्यादित व्हॉईस कॉलची सुविधा देतो.
- रिचार्जमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळतो. म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना 790GB डेटा मिळेल. त्याचबरोबर दररोज 100 एसएमएसचा लाभही दिला जात आहे.
- हा पॅक तसेच 30 दिवसांसाठी मोफत पीआरबीटी सोबत 30 दिवसांसाठी मोफत इरॉस नाऊ सेवा आणि लोकधुन देखील प्रदान करतो.
Jio चा 3599 रुपयांचा प्लॅन
प्लॅन | फायदे | वैधता |
3,599 रुपये | रोज 2.5GB, अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, रोज 100 SMS | 365 दिवस |
जिओ चा 3599 रुपयांचा प्लॅन
- या रिचार्जमध्ये, जिओ वापरकर्त्यांना एकूण 365 दिवसांची वैधता मिळते. या कालावधीत ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर मोफत लोकल/एसटीडी अमर्यादित कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात.
- रिचार्जमध्ये ग्राहकांना दररोज 2.5GB डेटा मिळतो. म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान कंपनीकडून 912.5GB 5G डेटा वापरण्यासाठी मिळेल.
- कॉलिंग आणि डेटा व्यतिरिक्त, प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसचा लाभ देखील मिळतो. त्याचवेळी प्लॅनमध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
कोणता प्लॅन सर्वोत्तम आहे?
फायदे आणि किमतीवरून हे स्पष्ट होते की बीएसएनएल रिचार्ज सर्वोत्तम आहे. तथापि, यामध्ये स्लो डेटा स्पीड स्लो मिळेल. परंतु, जर डेटा स्पीड ही तुमची प्राथमिकता नसेल तर तुम्ही दीर्घ वैधता आणि कमी किंमतीसह बीएसएनएल चा प्लॅन निवडू शकता.
येथे पहा BSNL चे एक वर्ष चालणाऱ्या प्लॅनची यादी
1. BSNL 1,198 रुपयांचा प्लॅन: बीएसएनएल चा हा प्रीपेड प्लॅन 365 दिवसांची वैधता देतो. या प्लॅनमध्ये 3GB डेटा आणि 300 मिनिटांच्या मासिक कॉलिंगची सुविधा मिळत आहे. या प्लॅनमध्ये दर महिन्याला 30 एसएमएस देखील मिळतात. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला हे लाभ अपडेट केले जातात.
2. BSNL 1,499 रुपयांचा प्लॅन: बीएसएनएलचा 1,499 रुपयांचा रिचार्ज प्लॅन कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह येतो. या पॅकमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधाही आहे आणि संपूर्ण वैधता कालावधीसाठी 24GB डेटा उपलब्ध आहे. हा प्रीपेड प्लॅन 336 दिवसांची वैधता देतो.
3. BSNL 1,999 रुपयांचा प्लॅन: बीएसएनएल चा 1,999 प्रीपेड रिचार्ज प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये संपूर्ण भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सेवा मिळते. याशिवाय, दररोज 3GB डेटाची सुविधा देखील आहे. एकदा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर ग्राहक तरीही 80Kbps च्या कमी स्पीडने इंटरनेट सर्फ करू शकतात. हा प्रीपेड प्लॅन संपूर्ण वर्षासाठी अमर्यादित साँग चेंज, लोकधुन कन्टेन्ट इरॉस नाऊ सबस्क्रीप्शनसह मोफत पीआरबीटी प्रदान करतो.
4. BSNL 2,999 रुपयांचा प्लॅन: बीएसएनएल चा नवीन प्लॅन व्हाऊचर अमर्यादित व्हॉईस कॉलसह येतो आणि 365 दिवसांची वैधता प्रदान करतो. या पॅकमध्ये दररोज 3GB डेटा आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतात.
येथे पहा जिओ चे एक वर्ष चालणारे रिचार्ज प्लॅन
1. जिओ चा 3999 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्स, दररोज 100 एसएमएस आणि जिओ ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन आणि दररोज 2.5GB डेटा देखील मिळतो. याशिवाय प्लॅनमध्ये FanCode चे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे.
टीप: तुम्हाला सांगतो की जिओ कडे एका वर्षांची वैधता असणारे फक्त दोन प्लॅन आहेत, ज्याची किंमत 3,599 रुपये आणि 3,999 रुपये आहे.