आज आहे Jio Offer चा शेवटचा दिवस; 15 दिवस मिळेल मोफत डेटा आणि सर्व सर्व्हिसेज

भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत अलीकडेच Reliance Jio नं मोबाइल युजर्ससाठी काही नवीन ऑफर व प्रीपेड प्लॅन (Jio Recharge Plan) ची घोषणा केली आहे. तसेच यावेळी कंपनीनं JioFiber इंडिपेंडेंस-डे ऑफर ‘हर घर तिरंगा, हर घर जियोफायबर’ देखील सादर केली होती. या ऑफर अंतगर्त नवीन ग्राहकांना अ‍ॅक्टिव्हेशनच्या वेळी निवडलेल्या प्लॅनमध्ये 15 दिवस मोफत बेनिफिट्स दिले जात आहे. परंतु या ऑफरचा लाभ घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर तुम्हाला देखील 15 दिवसांसाठी फ्री सर्व्हिसेज हव्या असतील तर त्वरा करा.

16 ऑगस्ट आहे लास्ट डेट

ही ऑफर त्या नवीन ग्राहकांसाठी अजूनही उपलब्ध आहे जे 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट, 2022 दरम्यान JioFiber पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्जा प्लॅनसह नवीन JioFiber कनेक्शन घेतील. तसेच, अ‍ॅक्टिव्हेशन 19 ऑगस्ट, 2022 पर्यंत पूर्ण करणं आवश्यक आहे.

JioFiber इंडिपेंडेंस-डे ऑफर

ही ऑफर नवीन JioFiber ग्राहकांना पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅन्स (Rs 499, Rs 599, Rs 799, Rs 899 plans) वरच मिळेल. तसेच, 6/12 महिन्यांच्या प्लॅनवरच या ऑफरचा लाभ घेता येईल. बेनिफिट्स मिळवण्यासाठी ग्राहकांना कंपनीच्या MyJio अ‍ॅपच्या MyVouchers सेक्शनमध्ये जावं लागेल, जिथे हे डिस्काउंट कॅश व्हाऊचर मिळतील.

Jio Fiber Plans

JioFiber चा 499 रुपयांचा प्लॅन: JioFiber च्या 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये GST चा समावेश नाही. तसेच, प्लॅनमध्ये 30 Mbps च्या स्पीडनं अनलिमिटेड डेटा ऑफर दिला जात आहे. तसेच यात Universal +, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play, JioCinema, ShemarooMe आणि JioSaavn चा फ्री अ‍ॅक्सेस मिळतो.

JioFiber चा 599 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये देखील बिलमध्ये GST वेगळा द्यावा लागेल. प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 Mbps स्पीडनं अनलिमिटेड डेटा दिला जात आहे. तसेच प्लॅनमध्ये Hotstar, SonyLIV, Zee5, Voot Select, Voot Kids, Sun NXT, Hoichoi, Discovery+, Universal +, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play, JioCinema, ShemarooMe आणि JioSaavn चा फ्री अ‍ॅक्सेस मिळेल.

JioFiber चा 799 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये देखील GST चा समवेश होत नाही. प्लॅनमध्ये 100 Mbps स्पीडनं अनलिमिटेड डेटा आणि Universal +, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play, JioCinema, ShemarooMe आणि JioSaavn सारख्या अ‍ॅप्सचं मोफत सब्सक्रिप्शन मिळतं.

JioFiber चा 899 रुपयांचा प्लॅन: JioFiber च्या दुसऱ्या प्लॅन प्रमाणेच या Plan मध्ये देखील GST अतिरिक्त रक्कम द्यावी लागेल. प्लॅनमध्ये 100 Mbps स्पीडनं अनलिमिटेड डेटा सह Hotstar, SonyLIV, Zee5, Voot Select, Voot Kids, Sun NXT, Hoichoi, Discovery+, Universal +, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play, JioCinema, ShemarooMe आणि JioSaavn चं सब्सक्रिप्शन फ्री दिलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here