OnePlus ने बाजारात आणखी एक दमदार डिवाईस लाँच केला आहे. हे Ace3 सीरिज अंतर्गत OnePlus Ace 3 Pro या नावाने चीनच्या देशांतर्गत बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे. आम्ही याला पॉवरफुल म्हणत आहोत, कारण ब्रँडने प्रथमच त्याच्या कोणत्याही मोबाईलमध्ये 6100mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. तसेच, स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा, 100 वॉट फास्ट चार्जिंग, IP65 रेटिंग, एक्स एक्सिस लायनर मोटर यांसारखी अनेक फीचर्स आहेत. चला पुढे याची संपूर्ण माहिती आणि किंमत तपशीलवार जाणून घेऊया.
OnePlus Ace 3 Pro चे स्पेसिफिकेशन (चीन)
- 6.78 इंचाचा 8T एलटीपीओ ॲमोलेड डिस्प्ले
- स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट
- 24GB रॅम + 1TB स्टोरेज
- 50MP + 8MP + 2MP रिअर कॅमेरा
- 16MP फ्रंट कॅमेरा
- 6100mAh बॅटरी
- 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग
- IP65 रेटिंग
- अँड्रॉईड 14
डिस्प्ले: OnePlus Ace 3 Pro फ्लॅगशिप फोनमध्ये 6.78-इंचाचा 8T एलटीपीओ ॲमोलेड डिस्प्ले आहे. यामध्ये 2780×1264 चे पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 4500 nits पर्यंत पीक ब्राईटनेस, 100% DCI-P3 कलर गॅमट, 2160Hz हाय-फ्रिक्वेंसी PWM डिमिंग, 360Hz टच सॅम्पलिंग रेट, 2160Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट, डॉल्बी व्हिजन आणि कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस 2 ची सुरक्षा देण्यात आली आहे.
चिपसेट: नवीन OnePlus मोबाईल ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटसह आला आहे. हा 4 नॅनोमीटर मोबाईल प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये ॲड्रेनो 750 GPU देऊ केला आहे.
स्टोरेज: डेटा सेव्ह करण्यासाठी 12GB, 16GB, 24GB LPDDR5X RAM + 256GB, 512GB आणि 1TB UFS 4.0 इंटरनल स्टोरेज मिळत आहे.
कॅमेरा: OnePlus Ace 3 Pro मध्ये LED सह ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. ज्यामध्ये OIS, 1/1.56″ Sony IMX890 सेन्सर, f/1.8 अपर्चरसह 50MP प्रायमरी, Sony IMX355 सेन्सरसह 8MP 120° अल्ट्रा-वाईड आणि 2MP Howe OV02B मायक्रो कॅमेरा लावण्यात आला आहे. त्याचवेळी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Samsung S5K3P9 सेन्सरसह 16MP फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी: OnePlus Ace 3 Pro देखील सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकते, कारण यात 6100mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. ही बाहुबली बॅटरी चार्ज करण्यासाठी यात 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे.
इतर: फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल 5G, 4G, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4, USB टाईप-सी तसेच पाणी आणि धूळ यांच्यापासून रक्षण करण्यासाठी IP65 रेटिंग दिली गेली आहे.
वजन आणि डायमेशन: डिव्हाईसचे ग्लास मॉडेल 163.3×75.27×8.85mm, लेदर 8.95mm आणि सिरॅमिक 8.69mm चे आहे.
ऑपरेटिंग सिस्टम: OnePlus Ace 3 Pro हा Android 14 आधारित ColorOS 14.1 सोबत मिळून काम करतो.
OnePlus Ace 3 Pro किंमत आणि उपलब्धता (चीन)
ब्रँडने OnePlus Ace 3 Pro ला 6 मेमरी व्हेरियंटमध्ये आणले आहे. हा ग्लाससह टायटॅनियम सिल्व्हर, व्हेगन लेदरसह हिरव्या आणि सिरॅमिक फिनिशमध्ये पांढऱ्या कलरमध्ये येतो. त्याची चीनमध्ये प्री-ऑर्डर सुरू झाली आहे. तर विक्री 3 जुलैपासून सुरू होणार आहे.