फक्त 7999 मध्ये आयफोनची मजा! भारतीय स्मार्टफोन Lava Yuva 2 Pro अधिकृतपणे लाँच

Highlights

  • हा स्मार्टफोन 7GB RAM सहा आला आहे.
  • Lava Yuva 2 Pro 3जीबी व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
  • कंपनी या फोनसह Free Service at Home ची सुविधा देत आहे.

भारतीय मोबाइल कंपनी लावानं अधिकृतपणे आपला नवीन मोबाइल फोन Lava Yuva 2 Pro देशात लाँच केला आहे. हा फोन रिटेल स्टोर्सवर उपलब्ध झाल्याची बातमी कालच आली होती, तर आज कंपनीनं वेबसाइटवर फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह करत याच्या किंमत व सेलची घोषणा केली आहे. लावा युवा 2 प्रो फक्त 7,999 रुपयांमध्ये भारतात लाँच केला गेला आहे, विशेष म्हणजे याच्या बॅक पॅनलवरील ट्रिपल कॅमेरा लेटेस्ट आयफोन सारखा दिसतो.

Lava Yuva 2 Pro Price

सर्वप्रथम फोनची किंमत व सेलची माहिती जाणून घेऊया. हा मोबाइल सध्या सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये बाजारात आला आहे. Lava Yuva 2 Pro मध्ये 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तसेच या फोनची किंमत फक्त 7,999 रुपये आहे. लावा युवा 2 प्रो देशात सेलसाठी उपलब्ध झाला आहे आणि हा Glass White, Glass Lavender आणि Glass Green कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: IPL 2023 live streaming: 31 मार्चपासून सुरु होणार क्रिकेटचा महासंग्राम; ‘इथे’ बघता येणार मोफत

Lava Yuva 2 Pro specifications

  • 6.5″ HD+ Notch Display
  • (4GB+ 3GB*) RAM + 64GB ROM
  • MediaTek Helio G37 Processor
  • 13MP AI Triple Rear Camera
  • 10W 5,000mAh battery

लावा युवा 2 प्रो स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोन स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे ज्यात 269पीपीआय आणि 16.7एम कलर सारखे फीचर्स मिळतात. या फोनचे डायमेंशन 164.5x76x9.0एमएम आणि वजन 204 ग्राम आहे.

Lava Yuva 2 Pro अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे. हा क्लिन अँड्रॉइड ओएस आहे ज्यावर कोणत्याही जाहिराती किंवा ब्लोटवेयर नाही. प्रोसेसिंगसाठी या लावा मोबाइलमध्ये मीडियाटेक हीलियो जी37 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. लावा युवा 2 प्रो 3जीबी व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जो इंटरनल रॅमसह याला 7जीबी रॅमची शक्ती देतो.

फोटोग्राफीसाठी या लावा मोबाइलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर आहे, जोडीला एक वीजीए आणि एक एआय लेन्स मिळते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Lava Yuva 2 Pro स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: या स्मार्टफोनच्या किंमतीवर जाऊ नका! 6GB RAM, 5,000mAh बॅटरीसह POCO C55 भारतात लाँच

Lava Yuva 2 Pro 4जी फोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. तर पावर बॅकअपसाठी हा मोबाइल 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की फुल चार्जनंतर हा फोन 581 तास म्हणजे जवळपास 25 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here