Lenovo कंपनी भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवण्याची योजना बनवत आहे. 91मोबाईल्सला एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि कंपनीने आपल्या ‘के’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनचे काम सुरु केले आहे जो Lenovo K13 नावाने बाजारात येईल. कंपनीने आतापर्यंत फोनच्या लाॅन्च संबंधित कोणतीही माहिती दिली नाही पण लेनोवो के13 मार्केट मध्ये येण्याआधी आम्हाला याच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. Lenovo K13 लो बजेट मध्ये लाॅन्च केला जाईल.
असा असेल लुक
91मोबाईल्सला Lenovo K13 च्या बॅक पॅनलचा फोटो मिळाला आहे. फोटो बघून समजले आहे कि लेनोवोचा हा फोन डुअल रियर कॅमेऱ्यावर लाॅन्च होईल जो बॅक पॅनलवर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये असेल. फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. रियर पॅनलवर खालच्या बाजूला पण वर्टिकल शेप मध्ये Lenovo ब्रँडिंग आहे, बाजूला स्पीकर फिट केला गेला आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर वाॅल्यूम राॅकर आणि पावर बटन आहे. लेनोवो के13 स्मार्टफोन Red आणि Blue कलर मध्ये समोर आला आहे.
असे असतील स्पेसिफिकेशन
मिळालेल्या माहितीनुसार Lenovo K13 1600 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाॅन्च केला जाईल. फोनचे वजन 200 ग्राम सांगण्यात आले आहे. लेनोवो के13 स्मार्टफोन अँड्रॉइड 10 आधारित असेल ज्यात प्रोसेसिंगसाठी 1.6गीगाहर्ट्ज क्लाॅक असलेला आक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. 91मोबाईल्सला मिळालेल्या माहितीनुसार लेनोवो आपला फोन 2 जीबी रॅमवर लाॅन्च करेल त्यासोबत 32 जीबी इंटरनल स्टोरेज असेल. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता पण येईल.
हे देखील वाचा : Redmi Note 10 सीरीज मार्च मध्ये होईल भारतात लाॅन्च, 10 तारखेला होऊ शकते एंट्री
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Lenovo K13 डुअल रियर कॅमेऱ्यावर लाॅन्च केला जाईल. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल त्याचबरोबर हा फोन 2 मेगापिक्सलच्या सेकंडरी सेंसरला सपोर्ट करेल. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. लेनोवो के13 डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करेल. फोन मध्ये चार्जिंगसाठी यूएसबी टाईप सी पोर्ट दिला जाईल.