जवळपास एक वर्षानंतर लेनोवो स्मार्टफोन बाजारात येत आहे. काही महिन्यापूर्वी चीन मध्ये कंपनी ने लेनोवो झेड5 आणि लेनोवो एस5 लॉन्च केला होता. तसेच भारतात कंपनी उद्या दोन फोन घेऊन येत आहे. तसेच 18 ऑक्टोबरला चीन मध्ये लेनोवो चा अजून एक मॉडेल लॉन्च होण्यास तयार आहे. कंपनी लेनोवो एस5 प्रो लॉन्च करणार आहे आणि या संबंधित काही माहिती समोर येत आहे.
आजच लेनोवो एस5 प्रो चा एक पोस्टर लीक करण्यात आला आहे ज्यात कंपनी ने स्पष्ट पाने माहिती दिली आहे कि या फोन मध्ये 20—मेगापिक्सल + 12—मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा असेल. तसेच कंपनी ने हि पण माहिती दिली आहे कि हा फोन तुम्हाला शानदार फोटोग्राफीचा अनुभव देतो. त्याचबरोबर हा रात्री पण चांगले शॉट घे शकतो. जरी फोनचे इतर स्पेसिफिकेशन माहिती समोर अली नसली तरी फोनचा निळा रंग स्पष्ट दिसत आहे. कॅमेरा सोबत फ्लॅश देण्यात आला आहे आणि साइडला वॉल्यूम आणि पावर बटन पण दिसत आहेत.
फोनचे इतर स्पेसिफिकेशन पाहता लीक मधून आतापर्यंत माहिती समोर आली आहे त्या नुसार हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर उपलब्ध होईल आणि यात तुम्हला 1.8गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर मिळेल. कंपनी हा 3जीबी + 64जीबी, 4जीबी + 64जीबी आणि 6जीबी + 128जीबी मेमरी सह सादर करू शकते.
माहिती नुसार लेनोवो एस5 प्रो मध्ये तुम्हाला 19:9 आसपेक्ट रेशियो सह 6.18 इंचाची नॉच डिजाइन असलेली स्क्रीन मिळू शकते. कंपनी हा फोन फुल एचडी+ स्क्रीन रेजल्यूशन सह सादर करू शकते. तसेच फोन मध्ये 8—मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि 3,500 एमएएच ची बॅटरी मिळू शकते. काही दिवसांपूर्वी हा फोन चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर लिस्ट करण्यात आला आहे तिथे हा 5 वेगवेगळ्या कलर वेरियंट मध्ये मिळू शकत्तो. त्यामुळे आशा आहे कि हा पाच कलर वेरियंट मध्ये हा फोन होईल. भारतात हा फोन कधी येईल याची माहिती अजूनतरी समजली नाही.














