साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यासाठी तयार आहे. एक टीजर इमेज समोर आल्यानंतर असा अंदाज लावला जात आहे कि कंपनी आपला नवीन स्मार्टफोन लवकरच सादर करू शकते. समोर आलेल्या इमेज मध्ये “#OMG Coming Soon” लिहिण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी हा स्मार्टफोन एम सीरीज मध्ये सादर करू शकते. एम सीरीजचे पहिले तीन स्मार्टफोन गॅलेक्सी ‘M10‘, ‘M20‘ आणि M30‘ एक्सीनोस प्रोसेसर वर चालतात, पण नवीन फोन मध्ये यापेक्षा जास्त जबरदस्त प्रोसेसरचा वापर केला जाणार आहे. सॅमसंग ‘M40‘ स्मार्टफोन मध्ये ‘होल-इन-डिस्प्ले’ सारखे काही प्रमुख फीचर्स पण दिसू शकतात.
This is a leaked teaser from @SamsungMobileIN about an upcoming device. What would be it? pic.twitter.com/CiFbQbE7di
— Sudhanshu Ambhore (@Sudhanshu1414) May 11, 2019
सॅमसंग पुढल्या महिन्याच्या सुरवातीला आपला नवीन फोन Samsung Galaxy M40 भारतात लॉन्च करेल. रिपोर्ट्स नुसार, याची किंमत 15,000-20,000 रुपयांच्या आसपास असेल. कंपनी सांगत आहे कि गॅलेक्सी ‘M40’ क्वॉलकम स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर आणि ट्रिपल कॅमेरा सिस्टम असलेला या सीरीजचा सर्वात पावरफुल फोन असेल.
हे देखील वाचा: फीचर फोन यूजर्स साठी एयरटेलने आणली खास भेट, या प्लान मध्ये मिळेल सर्वकाही
अलीकडेच Samsung Galaxy M40 गीकबेंच वर SM-M405F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता. गीकबेंचची हि लिस्टिंग आज म्हणजे 3 मे ची आहे ज्यात फोनच्या अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. लिस्टिंग मध्ये समजले आहे कि Galaxy M40 6जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला जाईल. पण सॅमसंग या फोनचे एकापेक्षा जास्त वेरिएंट बाजारात आणेल याची शक्यता पण नाकारता येत नाही.
गीकबेंच वर Galaxy M40 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई सह दाखवण्यात आला आहे ज्यात प्रोसेसिंग साठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 6150 चिपसेट दिला जाईल. विशेष म्हणजे हा चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेटचे कोडनेम आहे. स्कोरिंग बद्दल बोलायचे तर गीकबेंच ने Galaxy M40 ला सिंगल-कोर मध्ये 2350 स्कोर दिला आहे. तसेच मल्टी-कोर मध्ये या फोनला 6410 स्कोर मिळाला आहे.
हे देखील वाचा: Vivo नंतर Oppo ने पण केली F11 Pro च्या किंमतीत मोठी कपात, बघा नवीन प्राइस
फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता आता पर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार सॅमसंगच्या या फोन मध्ये सुपर एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. एमोलेड क्वॉलिटीचा डिस्प्ले दिल्यामुळे कदाचित सॅमसंग आपला हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणेल. या फोन मध्ये पण गॅलेक्सी एम सीरीज मधील स्मार्टफोन्स प्रमाणे वॉटरड्रॉप नॉच मिळू शकते.














