18 डिसेंबरला लॉन्च होईल लेनोवो झेड5एस, यात असेल इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा तसेच 3 रियर कॅमेरा सेंसर

लेनोवो बद्दल गेल्या महिन्यात बातमी आली होती की कंपनी डिसेंबर महिन्यात आपल्या झेड सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल, ज्यात ‘ओ’ शेप वॉटरड्रॉप नॉच दिली जाईल. आज लेनोवो ने आपल्या या स्मार्टफोनची लॉन्च डेट सांगितली आहे. लेनोवो ने माहिती दिली आहे की कंपनी येत्या 18 डिसेंबरला आपला नवीन स्मार्टफोन लेनोवो झेड5एस अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर सादर करेल. लॉन्च डेट सोबतच कंपनी ने झेड5एस च्या बॅक पॅनलचा फोटो पण शेयर केला आहे ज्यामुळे फोनच्या ट्रिपल रियर कॅमेराची माहिती सिद्ध झाली आहे.

लेनोवो ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून आपल्या नवीन स्मार्टफोनची लॉन्च डेट आॅफिशियल केली आहे. लेनोवो ने सांगितले आहे की कंपनी डिसेंबरच्या 18 तारखेला चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करेल आणि याच ईवेंट मधून झेड5एस टेक मंचावर येईल. लेनोवो झेड5एस च्या लॉन्च पोस्टर वर कंपनी ने झेड5एसचा बॅक पॅनल दाखवला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे ​वर्टिकल शेप मध्ये आहेत. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. तसेच फोनच्या साईड पॅनल वर वॉल्यूम रॉकर व पावर बटण पण देण्यात आला आहे.

लेनोवो झेड5एस बद्दल बोलले जात आहे की या फोनच्या फ्रंट पॅनल वर ‘ओ’ शेप नॉच दिली जाईल. हि नॉच ​फोनच्या बॉडी पार्ट पासून दूर फोनच्या डिस्प्लेच्या वर असेल. या नॉचच्या चारही बाजूला फोनची स्क्रीन असेल तसेच नॉच मधेच सेल्फी कॅमेरा दिला जाईल. आधी समोर आलेल्या फोटो वरून समजले होते की झेड5एस चे किनारे राउंड ऐज वाले असतील तसेच फोनची फ्रेम ग्लॉसी ब्लॅक टाईप असेल. टेना ची लिस्टिंग पाहता तिथे लेनोवो झेड5एस 6.3-इंचाच्या डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे तसेच फोन चे डायमेंशन 156.7×74.5×7.8एमएम असे होते.

टेना च्या लिस्टिंग मध्ये लेनोवो झेड5एस मध्ये डुअल सिम व ​डुअल स्टॅन्डबॉय फीचर असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच फोन मध्ये 4जी वोएलटीई सोबत 3210 एमएएच ची बॅटरी असल्याचे टेना लिस्टिंग वरून समजले होते. लेनोवो येत 18 डिसेंबरला झेड5एस आॅफिशियली सादर करेल. या फोनचे ठोस स्पेसिफिकेशन्स तसेच फोनच्या किंमतीसाठी आता 18 डिसेंबरची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here