LG घेऊन येत आहे 3 जीबी रॅम असलेला नवीन फोन, लो बजेट मध्ये होईल लॉन्च

गेल्या आठवड्यात टेक विश्वात LG ची चर्चा होती. बातमी अशी होती कि हि कोरियन कंपनी आपला मिडबजेट 5G फोन LG Velvet चा 4G मॉडेल पण लॉन्च करणार आहे. हा फोन बेंचमार्किंग साइट वर पण लिस्ट झाला आहे. तसेच आता पुन्हा एलजी चर्चेत आहे. कंपनीचा एक नवीन बजेट स्मार्टफोन आता इंटरनेट वर वायरल झाला आहे जो गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंग मध्ये LGE LGL555DL मॉडेल नंबर असलेल्या या फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

LG चा हा आगामी स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट झाला आहे, जो एमएसपी ने स्पॉट केला आहे. लिस्टिंग मध्ये फोनह्या नावाची माहिती तर मिळाली नाही पण हा फोन LGE LGL555DL मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. हि लिस्टिंग काल म्हणजे 22 जूनची आहे, लॉन्चच्या आधीच फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. फोन स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर गीकबेंच वर हा एलजी फोन एंडरॉयड 9 पाई सह दाखवण्यात आला आहे.

गीकबेंच वर हा फोन 3 जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे. इथे फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे, ज्या सोबत मदरबोर्डच्या जागी MT6765 लिहण्यात आले आहे. लक्षात असू दे कि हा मीडियाटेकच्या हीलियो पी22 चिपसेटचा कोडनेम आहे. स्पेसिफिकेशन्स वरून पण स्पष्ट होत आहे कि LGL555DL एलजी द्वारे लो बजेट मध्ये लॉन्च केला जाईल.

बेंचमार्किंग स्कोर बद्दल बोलायचे तर एलजी च्या या आगामी स्मार्टफोनला सिंगल-कोर मध्ये 139 स्कोर मिळाला आहे तसेच मल्टी-कोर मध्ये या फोनला 492 स्कोर देण्यात आला आहे. LG हा फोन कधी मार्केट मध्ये सादर करेल आणि या फोनचे नाव काय असेल, हि सर्व माहिती समोर येण्याची वाट बघितली जात आहे. LG कमी किंमतीत आपला फोन लॉन्च करून Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँड्सना पण टक्कर देऊ शकते.

LG W10 Alpha

एलजी डब्ल्यू10 अल्फा कंपनीचा स्वस्त फोन आहे जो भारतात 9,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2.5डी ग्लास ने प्रोटेक्टेड 5.41 इंचाचा एचडी+ रेनड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड पाई सह हा फोन 1.6गीगाहर्ट्ज आक्टाकोर स्प्रेडट्रम एससी9863 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज सह उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी LG W10 Alpha च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच LG W10 Alpha सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. LG W10 Alpha डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी LG W10 Alpha 3,450एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. एलजी चा हा नवीन फोन ब्लॅक कलर मध्ये फक्त 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

एलजी डब्ल्यू30 वीडियो

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here