LG ने लॉन्च केला अजून एक कमी किंमत असलेला शानदार स्मार्टफोन LG Q31, बघा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

LG ने अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘क्यू सीरीज’ मध्ये नवीन स्मार्टफोन जोडला आहे जो LG Q31 नावाने लॉन्च केला गेला आहे. कमी किंमत असलेल्या या मोबाईल मध्ये तीन कॅमेऱ्यांसोबतच मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे जो सध्या एलजीच्या होम मार्केट म्हणजे कोरिया मध्ये आला आहे आणि येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. एलजी क्यू31 च्या भारतातील लॉन्चची माहिती अजूनतरी समोर आलेली नाही.

LG Q31

एलजी क्यू31 कंपनीने 18.9:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.7 इंचाच्या एचडी+ फुलविजन डिस्प्लेला सपोर्ट करतो. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या दोन्ही बाजू नॅरो बेजल्स सह येतात तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे.

LG Q31 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हीलियो पी22 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये पावरवीआर जीई8320 जीपीयू आहे. एलजीने हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर हॉरिजॉन्टल शेप डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एफ/2.2 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

LG Q31 सिंगल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 147.9x71x8.7एमएम आणि वजन 145ग्राम आहे. 3.5एमएम जॅक सोबतच एलजी क्यू31 बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर सह येतो, सोबतच हा फोन पावर बॅकअपसाठी 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन metallic silver मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत 2,09,000 won म्हणजे जवळपास 12,900 रुपयांच्या आसपास आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here