14 जानेवारीला भारतात येऊ शकतो OPPO A78 5G Phone

स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो लवकरच भारतात आपला नवा 5जी फोन ए78 लाँच करू शकते. हा फोन पुढील आठवड्यात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. या फोनबद्दल भारतीय टिपस्टर सुधांशुनं एक बातमी पोस्ट केली आहे की हा फोन 14 जानेवारीला भारतात लाँच होऊ शकतो आणि याची किंमत 18 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, OPPO A78 5G ची प्री-बुकिंग 12 जानेवारीपासून सुरु होऊ शकते आणि 14 जानेवारीपासून हा फोन सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

ओप्पो ए78 5जी ची भारतातील संभाव्य किंमत

मिळालेल्या माहितीनुसार ओप्पो ए78 5जी फोन येत्या 14 जानेवारीला भारतात लाँच होईल. टिपस्टर सुधांशुच्या मते, हा एक मिडबजेट स्मार्टफोन असू शकतो जो ऑफलाइन मार्केटचा विचार करून सादर केला जाऊ शकतो. लीकनुसार या ओप्पो मोबाइलची भारतातील किंमत 18,500 रुपये किंवा 19,000 रुपयांपासून सुरु होऊ शकते. ही किंमत फोनच्या बेस व्हेरिएंटची असू शकते, हा फोन जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सेलसाठी देखील उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 16GB RAM ची ताकद; बजेटमध्ये दमदार गेमिंग परफॉर्मन्ससाठी Realme 10 भारतात लाँच

दिल्लीमधील एका रिटेलरनं माहिती दिली आहे की, ‘भारतात जियो आणि एयरटेलनं 5जी सर्व्हिस लाँच केल्यामुळे 5जी स्मार्टफोनच्या मागणीत वाढ झाल्याचं दिसलं आहे आणि कंपनीकडे हायएन्ड बजेटमध्ये 5जी फोन तर आहेत परंतु बजेट सेगमेंटमध्ये 5जी पोर्टफोलियो थोडा कमजोर होतो. त्यामुळे ओप्पो ए78 5जी लाँच करून कंपनी ऑफलाइन सेग्मेंटची ताकद वाढवू पाहत आहे.”

ओप्पो ए78 5जी चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.54″ HD+ 90Hz display
  • MediaTek Dimensity 700
  • 8GB RAM + 128GB storage
  • 50MP dual-rear camera
  • 33W 5000mAh battery

आधी ओप्पो ए78 5जी फोन मलेशियन मार्केटमध्ये आल्यामुळे फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती सहज उपलब्ध झाली आहे. हा मोबाइल फोन 1612 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.54 इंचाच्या एचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. ही स्क्रीन 296पीपीआय आणि 600निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्ससह येते जिला पांडा ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन आयपीएक्स4 रेटेड आहे.

OPPO A78 5G अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर चालतो. ज्यात ऑक्टाकोर मीडियाटेक डिमेनसिटी 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन LPDDR4X RAM आणि UFS2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो. OPPO A78 5G साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए78 5जी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी ब्लॅक अँड व्हाईड सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या ओप्पो मोबाइलमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: अंबानी पाठोपाठ अदानीही 5G च्या मैदानात, यंदा सुरु करणार नवं नेटवर्क

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here