Amazon Great Republic Day Sale 2023: डिस्काउंट आणि ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करा फोन, या आहेत सर्वात बेस्ट डील्स

लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन यंदाचा Great Republic Day Sale सुरु झाला आहे, ज्यात विविध कॅटेगरीमधील प्रोडक्ट्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. यावर्षीचा पहिला मोठा सेल 15 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. परंतु अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर्स या सेलमधील ऑफर्सचा फायदा 24 तास आधीच घेऊ शकतात. नेहमीप्रमाणे आम्ही तुमच्यासाठी या सेलमधील बेस्ट डील्स घेऊन आलो आहोत, त्यामुळे तुम्हाला डील्स आणि ऑफर्सच्या मोठ्या यादीत शोधाशोध करण्याचे कष्ट करावे लागणार नाहीत.

जर तुम्ही अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2023 मध्ये बेस्ट स्मार्टफोन डील्स शोधत असाल तर त्याची सोय आम्ही या आर्टिकलमध्ये केली आहे. या यादीत असे बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्स आहेत जे आकर्षक किंमतीत उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे थेट डिस्काउंटसह ई-कॉमर्स जायंट एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रँजॅक्शनवर 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील देत आहे. जास्त वेळ न दवडता आपण या सेलमधील बेस्ट स्मार्टफोन डील्सची माहिती घेऊया.

iPhone 13

जर तुम्हाला जास्त पैसे खर्च न करता एक प्रीमियम अ‍ॅप्पल स्मार्टफोन हवा असेल तर तुमच्यासाठी ही योग्य संधी आहे. कारण iPhone 13 या सेलमध्ये बँक डिस्काउंटसह 58,900 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे, ज्याची मूळ किंमत 79,900 रुपये आहे. या फोनमध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले मिळतो. यात पावरफुल आणि एनर्जी एफिशियंट ए15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. iPhone 13 च्या मागे असलेल्या 12MP चा एक वाइड आणि एक अल्ट्रा वाइड कॅमेरा शानदार फोटोज क्लिक करतो. या कॅमेरा सेटअपमध्ये स्मार्ट एचडीआर 4, फोटोग्राफिक स्टाईल, 4के डॉल्बी व्हिजन एचडीआर व्हिडीओ आणि इतर अनेक जबरदस्त फिचर मिळतात. यात एक सिनेमॅटिक मोड देखील आहे जो प्रो लेव्हल व्हिडीओ शूट करण्यास मदत करतो. iPhone 13 मध्ये एक मजबूत बिल्ड, फ्रंटला सिरॅमिक शिल्ड आणि वॉटर रेजिस्टन्स मिळते.

  • प्राइस: 79,900 रुपये
  • डील प्राइस: 58,900 रुपये (बँक डिस्काउंट आणि ऑफर्स मिळून)

OnePlus Nord 2T 5G

वनप्लसचा लोकप्रिय मिडरेंज स्मार्टफोन OnePlus Nord 2T 5G देखील डिस्काउंटनंतर 27,499 रुपये (बँक डिस्काउंट आणि ऑफर्स मिळून) किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे, इतरवेळी हा स्मार्टफोन 28,999 रुपयांमध्ये खरेदी करावा लागतो. OnePlus Nord 2T 5G एक 5जी डिवाइस आहे ज्यात मीडियाटेकचा पावरफुल Dimensity 1300 चिस्पेट देण्यात आला आहे, जो अँड्रॉइड 12 आधारित ऑक्सिजन ओएसवर चालतो. या फोनमध्ये 4,500mAh ची बटर देण्यात आली आहे, जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी यात OIS असलेला 50MP चा प्रायमरी कॅमेरा (Sony IMX766) आणि 32MP चा सेल्फी शुटर (Sony IMX615) देण्यात आला आहे. फ्रंटला फोनमध्ये 6.43-इंचाचा फुलएचडी + अ‍ॅमोलेड पॅनल मिळतो जो 90Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह येतो.

  • प्राइस: 28,999 रुपये
  • डील प्राइस: 27,499 रुपये (बँक डिस्काउंट आणि ऑफर्स मिळून)

Redmi 11 Prime 5G

पावरफुल बजेट 5जी स्मार्टफोन Redmi 11 Prime 5G देखील या सेलमध्ये बँक डिस्काउंट आणि ऑफर्सनंतर 12, 999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे, अन्यथा यासाठी 15,999 रुपये मोजावे लागले असते. या फोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे, जो एकूण 7 5जी बँड्सना सपोर्ट करतो. यात 6.58-इंचाचा 90Hz रिफ्रेश रेट असलेला फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. टाइप सी चार्जिंग पोर्ट असलेल्या या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

  • प्राइस: 15,999 रुपये
  • डील प्राइस: 11,999 रुपये (बँक डिस्काउंट आणि ऑफर्स मिळून)

realme narzo 50

या सेलमध्ये realme narzo 50 देखील बँक डिस्काउंट आणि ऑफर्समुळे 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल, जो इतरवेळी 15,999 रुपयांना पडतो. realme narzo 50 मध्ये 6.6-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP एआय ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. यात 5,000mAh ची मोठी बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी फोनमध्ये मीडियाटेकचा Helio G96 गेमिंग प्रोसेसर मिळतो, जोडीला ग्राफिक्ससाठी Mali-G57 MC2 GPU आहे. सिक्योरिटीसाठी वेगवान फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय 2.0 वर चालतो.

  • प्राइस: 15,999 रुपये
  • डील प्राइस: 8,499 रुपये (बँक डिस्काउंट आणि ऑफर्स मिळून)

Samsung Galaxy M13

Samsung Galaxy M13 देशातील एक लोकप्रिय स्मार्टफोन आहे, ज्यात योग्य दारात चांगले स्पेसिफिकेशन्स मिळतात. बँक डिस्काउंट आणि ऑफर्सनंतर याची सेलिंग प्राइस 9,999 रुपये झाली आहे, नाही तर इतर वेळी हा मॉडेल 14,999 रुपयांमध्ये खरेदी करावा लागतो. Galaxy M13 मध्ये 6.6-इंचाचा FHD+ इन्फिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं यात स्वतःच्या Exynos 850 प्रोसेसरचा वापर केला आहे. याची खासियत म्हणजे यात 6,000mAh ची मोठी बॅटरी मिळते. फोटोग्राफीसाठी 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, तर फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. क्नॉक्स सिक्योरिटी हॅकिंग सारख्या बाहेरील हल्ल्यांपासून वाचवते आणि यात फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

  • प्राइस: 14,999 रुपये
  • डील प्राइस: 9,999 रुपये (बँक डिस्काउंट आणि ऑफर्स मिळून)

Redmi A1

Redmi A1 एक जबरदस्त एंट्री लेव्हल डिवाइस आहे किंवा सेकंडरी स्मार्टफोन ठरतो. हा फोन आकर्षक बँक डिस्काउंट आणि ऑफर्सनंतर 8,999 रुपयांच्या ऐवजी 5,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. यात 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले आणि MediaTek Helio A22 प्रोसेसर आहे. फोनच्या मागे 8MP ड्युअल एआय कॅमेरा आणि फ्रंटला 5MP सेल्फी सेन्सर आहे. फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, ड्युअल सिम स्लॉट आणि खास एसडी कार्ड स्लॉट मिळतो. यातील 5,000mAh ची मोठी बॅटरी 10W चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते.

  • प्राइस: 8,999 रुपये
  • डील प्राइस: 5,999 रुपये (बँक डिस्काउंट आणि ऑफर्स मिळून)

iQOO Z6 Lite 5G

iQOO Z6 Lite 5G वर देखील अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये जबरदस्त ऑफर आहे. हा फिचर पॅक्ड स्मार्टफोन सेलमध्ये 12,499 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. बँक डिस्काउंट आणि ऑफर्सपूर्वी ही किंमत 15,999 रुपये होती. iQOO Z6 Lite मध्ये 6.58-FHD+ डिस्प्ले देण्यात जो 120Hz रिफ्रेश रेटसह 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये जगातील पहिला स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 प्रोसेसर मिळतो. पावर बॅकअपसाठी डिवाइसमध्ये 18W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी मिळते. iQOO Z6 Lite मध्ये कंपनीनं ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात 50MP ची आय ऑटोफोकस प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स मिळते. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

  • प्राइस: 15,999 रुपये
  • डील प्राइस: 12,499 रुपये (बँक डिस्काउंट आणि ऑफर्स मिळून)

iPhone 12

आयफोनच्या नव्या मॉडेल्सकडे सर्वांच्या नजारा आहेत परंतु आपल्या पावरफुल हार्डवेयरच्या जोरावरवर 2023 मध्ये Apple iPhone 12 अजूनही टिकून आहे. सेलमध्ये बँक डिस्काउंट आणि ऑफर्समुळे हा फोन 51,999 रुपयांमध्ये विकला जात आहे, इतरवेळी याची किंमत 65,900 रुपये असते. यात प्रोसेसिंगसाठी A14 Bionic चिपचा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये 6.1-इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला आहे. मागे 12MP चे अल्ट्रा वाइड आणि वाइड असे दोन कॅमेरा सेन्सर आहेत तर पुढे 12MP ट्रू डेप्थ सेल्फी सेन्सर मिळतो.

  • प्राइस: 65,900 रुपये
  • डील प्राइस: 51,999 रुपये (बँक डिस्काउंट आणि ऑफर्स मिळून)

Redmi Note 11

रेडमीची नोट लाइनअप नेहमीच पैसे वसूल फीचर्स देते. या सेलमध्ये Redmi Note 11 स्मार्टफोन खूप आकर्षक किंमतीत उपलब्ध झाला आहे. एरव्ही 17,999 रुपयांमध्ये विकला जाणारा हा मॉडेल बँक डिस्काउंट आणि ऑफर्सनंतर 11,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. यात 90Hz रिफ्रेश रेट आलेला फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो, जो या प्राइस रेंजमध्ये दुर्मिळ आहे. प्रोसेसिंगसाठी यात क्वॉलकॉमचा Snapdragon 680 चिपसेट मिळतो. जोडीला वेगवान UFS 2.2 स्टोरेज आणि एनहान्सड कुलिंग मिळते. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो. तसेच यात झेड- अ‍ॅक्सिस व्हायब्रेशन मोटर, IP53 रेटिंग, 3.5mm हेडफोन जॅक, आयआर ब्लास्टर आणि इतर फीचर्स मिळतात.

  • प्राइस: 17,999 रुपये
  • डील प्राइस: 11,999 रुपये (बँक डिस्काउंट आणि ऑफर्स मिळून)

OnePlus 10T 5G

OnePlus 10T 5G स्मार्टफोन बँक डिस्काउंट आणि ऑफर्सनंतर 49,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे, ज्याची एरव्ही किंमत 54,999 रुपये असते. OnePlus 10T 5G मध्ये 6.7-इंचाचा शानदार अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट, HDR 10+, sRGB, डिस्प्ले P3 आणि 10-bit सपोर्ट सारख्या फीचर्ससह येतो. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटवर चालतो आणि यात 4,800mAh ची बॅटरी 150W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. लॅग फ्री गेमिंगसाठी कंपनीनं यात 3डी कलिंग सिस्टम 3.0 दिली आहे. मागे OIS सपोर्टसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा (Sony IMX766) आहे तर फ्रंटला EIS सह 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित ऑक्सिजन ओएसवर चालतो.

  • प्राइस: 54,999 रुपये
  • डील प्राइस: 49,999 रुपये (बँक डिस्काउंट आणि ऑफर्स मिळून)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here