Nokia Launch IFA 2022: नोकिया अँड्रॉइड स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नव्यानं सक्रिय झाली आहे. कंपनीच्या स्मार्टफोन्समध्ये किंमतीला साजेसे स्पेसिफिकेशन्स नसतात अशी तक्रार काही ग्राहक करतात. परंतु दुसरीकडे स्मार्टफोन्सची बिल्ड क्वॉलिटी, वेळेवर मिळणारे अपडेट आणि क्लीन युआयचं कौतुक करणारे लोक देखील आहेत. आता नोकियाचे तीन नवीन स्मार्टफोन Nokia C31, Nokia X30 5G आणि Nokia G60 5G तसेच एक टॅबलेट Nokia T21 IFA 2022 च्या मंचावरून लाँच झाले आहेत. हे सर्व डिवायस सध्या ग्लोबल मंचावरच सादर करण्यात आले आहेत परंतु लवकरच हे भारतीय बाजारात सेलसाठी उपलब्ध होतील. पुढे आम्ही 6.75” Display, 4GB RAM, 13P Camera आणि 5,050mAh Battery असलेल्या नोकिया सी31 स्मार्टफोनची माहिती दिली आहे.
Nokia C31 Specifications
नोकिया सी31 स्मार्टफोन 6.75 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे जो एलसीडी पॅनलवर बनला असून एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 169.2 x 78 x 8.6एमएम आणि वजन 200ग्राम आहे. हा नोकिया मोबाइल आयपी52 रेटेड आहे, त्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. हे देखील वाचा: अॅडव्हान्स फीचर्स, स्पेसिफिकेशन्ससह आला Nokia X30 5G; कंपनीनं केला पर्यावरणपूरक मटेरियलचा वापर
Nokia C31 अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे ज्यात 2 वर्षाचे सिक्योरिटी पॅच देणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc 9863A1 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 4GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. जोडीला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नोकिया मोबाइल 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Nokia C31 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,050एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 3 वर्षांच्या वॉरंटीसह Nokia G60 5G लाँच; स्वस्तात 6GB RAM आणि 50MP कॅमेरा
Nokia C31 Price
जागतिक बाजारात नोकिया सी31 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट्स ग्राहकांच्या भेटीला आले आहेत. यात 3GB RAM + 32GB Storage, 4GB RAM + 64GB Storage आणि 4GB RAM + 128GB Storage चा समावेश आहे. भारतीय करंसीनुसार Nokia C31 ची Price जवळपास 19,000 रुपयांपासून सुरु होते. नोकिया सी31 Charcoal, Cyan आणि Mint कलरमध्ये लाँच झाला आहे. या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती मात्र कंपनीनं अजूनतरी दिली नाही.
















