अ‍ॅडव्हान्स फीचर्स, स्पेसिफिकेशन्ससह आला Nokia X30 5G; कंपनीनं केला पर्यावरणपूरक मटेरियलचा वापर

nokia x30 5g launched most eco friendly nokia smartphone know price specifications sale offer deals

Nokia ब्रँडची मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी HMD Global नं IFA 2022 च्या मंचावरून आपल्या टेक्नॉलॉजीचं शक्तिप्रदर्शन करत अनेक नवीन प्रोडक्ट सादर केले आहेत. यात Nokia G60 5G, Nokia C31 आणि Nokia X30 5G चा समावेश आहे. यातील एक नोकिया एक्स30 5जी कंपनीनं most eco-friendly Nokia smartphone असल्याचं म्हटलं आहे, ज्याच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसची माहिती पुढे देण्यात आली आहे.

Nokia X30 5G Phone ची सर्वात मोठी यूएसपी याची डिजाईन आणि इको फ्रेंडली बॉडी आहे. हा मोबाइल मेटल फ्रेमवर बनलेला आहे ज्यात 100 टक्के रीसायकल होणाऱ्या अ‍ॅल्युमिनियम फ्रेम तसेच 65 टक्क्यापर्यंत रिसायकल होणाऱ्या प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. फोनच्या रिटेल बॉक्समध्ये देखील अशाचा कागदाचा वापर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीचं टेन्शन वाढलं; 3 वर्षांच्या वॉरंटीसह Nokia G60 5G लाँच; स्वस्तात 6GB RAM आणि 50MP कॅमेरा

nokia x30 5g launched most eco friendly nokia smartphone know price specifications sale offer deals

Nokia X30 5G Specifications

नोकिया एक्स30 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता, हा फोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 6.43 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबतच 700निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोन डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा देण्यात आली आहे.

Nokia X30 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो 3 वर्षांच्या ओएस अपडेट, 3 वर्षांच्या सिक्योरिटी पॅच तसेच 3 वर्षांच्या फोन वॉरंटीसह येतो. फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.

nokia x30 5g launched most eco friendly nokia smartphone know price specifications sale offer deals

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगलसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या नोकिया मोबाइलमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोनच्या कॅमेरा लेन्सला देखील गोरिल्ला ग्लास डीएक्स4 ची सुरक्षा देण्यात आली आहे.

Nokia X30 5G सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करते तसेच पावर बॅकअपसाठी यात 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,200एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया एक्स30 5जी फोन आयपी67 रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. तसेच या फोनमध्ये आयआर ब्लास्टर व एनएफसीसह अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. हे देखील वाचा: महिनाभर टिकेल या 4G फोनची बॅटरी; दोन स्क्रीन असलेला लो बजेट Nokia 2660 Flip भारतात लाँच

nokia x30 5g launched most eco friendly nokia smartphone know price specifications sale offer deals

Nokia X30 5G Price

ग्लोबल मार्केटमध्ये नोकिया एक्स30 5जी फोन दोन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे यात 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज तसेच 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता Nokia X30 5G ची प्रारंभिक किंमत भारतीय करंसीनुसार 42,000 रुपयांच्या आसपास आहे. नोकिया एक्स30 5जी फोननं Cloudy Blue आणि Ice White कलरमध्ये एंट्री घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here