असं असावं नशीब! फ्लिपकार्टवर ऑर्डर केला होता स्वस्त मोबाइल, त्याऐवजी मिळाला नवाकोरा iPhone 14

Online Shopping fraud व फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येतात. गेल्या महिन्यात झालेल्या सेलमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे स्मार्टफोन, लॅपटॉप व अन्य महागड्या वस्तू Flipkart आणि Amazon सारख्या ऑनलाईन शॉपिंग साइट्सवरून खरेदी केल्या गेल्या परंतु त्याऐवजी ग्राहकांना साबण, वीट व अन्य भंगार डिलिव्हर करण्यात आलं. चुकीची वस्तू डिलिव्हर करण्याची आता अजून एक घटना समोर आली आहे परंतु ही थोडी वेगळी व रंजक आहे. बातमी अशी आहे की फ्लिपकार्टनं चुकून एका व्यक्तीला स्वस्त मोबाइल पाठवण्याच्या ऐवजी Apple iPhone 14 डिलिव्हर केला आहे.

आशीष हेगडे नावाच्या एका व्यक्तीनं ही घटना आपल्या ट्वीटर हँडलवर शेयर केली आहे. ट्वीटमध्ये आशीषनं त्याच्या एका फॉलोवर सोबत ही घटना घडल्याचं म्हटलं आहे. ट्वीटमध्ये फ्लिपकार्ट ऑर्डर डिटेल्स सोबतच डिलिव्हर करण्यात आलेल्या आयफोन 14 च्या बॉक्सचा फोटो देखील शेयर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे ते. हे देखील वाचा: Airtel 5G Launched: Airtel 5G Plus ‘या’ शहरांमध्ये लाँच; 5G सर्व्हिसच्या प्लॅन्सची माहिती आली समोर

चुकून मिळाला आयफोन 14

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीनं शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरून Apple iPhone 13 विकत घेता होता. जो Blue कलर असलेला 128GB Storage मॉडेल होता ज्यासाठी त्या व्यक्तीनं 49,019 रुपयांची किंमत देखील चुकती केली होती. ही ऑर्डर 22 सप्टेंबरला करण्यात आली होती. आयफोन 13 खरेदी केल्यामुळे ही व्यक्ती खूप आनंदी होती आणि आपल्या नवीन अ‍ॅप्पल मोबाइलची वाट बघत होता. या आनंदाचे कारण म्हणजे iPhone 13 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळाला होता.

man received iphone 14 by mistake in flipkart sale

परंतु तिकडे फ्लिपकार्टमध्ये वेगळाच घोळ सुरु होता. ठरलेल्या तारखेला नवीन आयफोन डिलिव्हर करण्यात आला. जेव्हा त्या व्यक्तीं आपल्या अ‍ॅप्पल फोनचा बॉक्स ओपन केलं तेव्हा तो थक्क झाला. त्या बॉक्समध्ये आयफोन होता परंतु iPhone 13 नसून त्याजागी iPhone 14 होता. काही लोकांना कदाचित ही मोठी गोष्ट वर्णही नाही परंतु थोडक्यात सांगायचं तर आयफोन 13 साठी 49,019 रुपये देण्यात आले होते तर आयफोन 14 ची प्राइस 79,900 रुपये आहे. म्हणजे एक मॉडेल नंबरमध्ये एक अंक बदलामुळे 30,000 रुपयांचा फरक पडतो. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत 50MP Camera असलेला नवीन 5G Phone; मिळतेय 7GB RAM ची पावर

iPhone 14 Price in India

49,019 रुपयांच्या Apple iPhone 13 च्या जागी त्या व्यक्तीला 79,900 रुपयांचा Apple iPhone 14 डिलिव्हर करण्यात आला आहे आणि त्याला थेट 30 हजार रुपयांचा फायदा झाला आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरील आयफोन 14 ची किंमत पाहता या अ‍ॅप्पल फोनचा सर्वात छोटा मॉडेल 79,900 रुपयांमध्ये विकला जात ज्यात 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे iPhone 14 256GB मॉडेल फ्लिपकार्टवर 89,900 रुपयांमध्ये विकला जात आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here