Airtel 5G Launched: Airtel 5G Plus ‘या’ शहरांमध्ये लाँच; 5G सर्व्हिसच्या प्लॅन्सची माहिती आली समोर

Airtel 5G services launch full list of cities where Airtel 5G Plus available 5G SIM 5G Plan

Airtel 5G Launched: भारती एयरटेलनं देशात Airtel 5G Plus सेवा सुरु केली आहे. टेलीकॉम सेक्टरमध्ये सर्वप्रथम 5G सर्व्हिस सुरु करणाऱ्या कंपनी एयरटेलचं 5G (Airtel 5G Plus) सध्या आठ शहरांमध्ये लाइव्ह करण्यात आलं आहे, ज्यासाठी कंपनी युजर्सना मेसेज देखील पाठवत आहे. तसेच 5G प्लस सर्व्हिस (Airtel 5G Plus Service) बद्दल कंपनीनं म्हटलं आहे की युजर्सना आता आधीपेक्षा 20-30 पट वेगवान नेटवर्कची सुविधा मिळेल, ज्यात शानदार साउंड एक्सपीरिएंस सोबतच जबरदस्त कॉल कनेक्टिव्हिटी देखील असेल. कंपनीनं Airtel 5G SIM आणि Airtel 5G Plan विषयी युजर्सना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

Airtel 5G Plus या शहरांमध्ये लाइव्ह

Airtel 5G Plus सर्वप्रथम Delhi, Mumbai, Chennai, Bengaluru, Hyderabad, Siliguri, Nagpur आणि Varanasi या आठ शहरांमध्ये सुरु करण्यात आलं आहे. तसेच कंपनी आपल्या एयरेटल ग्राहकांना मेसेज पाठवून याची माहिती देत आहे. 91मोबाइल्सच्या टीम मेंबरला एयरेटल 5G सर्व्हिस लाइव्ह झाल्याचा मेसेज आला आहे. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत 50MP Camera असलेला नवीन 5G Phone; मिळतेय 7GB RAM ची पावर

Airtel 5G services launch full list of cities where Airtel 5G Plus available 5G SIM 5G Plan

Airtel 5G SIM कसे मिळेल?

कंपनीनं स्पष्ट केलं आहे की 5जी प्लस सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आपलं सिम कार्ड (Airtel 5G SIM) बदलण्याची गरज नाही कारण साध्य असलेल्या Airtel 4G SIM वरच 5जी नेटवर्कचा वापर करता येईल. म्हणजे सध्या ग्राहकांना 5G SIM ची गरज नाही.

Airtel 5G services launch full list of cities where Airtel 5G Plus available 5G SIM 5G Plan

Airtel 5G Recharge Plan

कंपनीनुसार सध्यातरी 4जी प्लॅनच्या किंमतीतच ग्राहकांना 5जी वापरता येईल. म्हणजे तुम्ही 4जी प्लॅनच्या जीवावर 5जीची मजा घेता येईल. त्यामुळे एयरेटलचा सर्वात स्वस्त 5G रिचार्ज प्लॅन 249 रुपयांचा होईल जो एक 4G प्लॅन आहे. यात 2 जीबी डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा आणि 24 दिवसांची वैधता मिळते.

Airtel 5G services launch full list of cities where Airtel 5G Plus available 5G SIM 5G Plan

Airtel 5G Plus Speed

कंपनीनं दावा केला आहे की Airtel 5G Plus मध्ये युजर्स आता 30 पट जास्त वेगानं इंटरनेट वापरू शकतील. तसेच कंपनीनं Airtel 5G Plus सर्व्हिस 6 ऑक्टोबर संध्याकाळी सहा वाजता लाइव्ह केली आहे. म्हणजे उपरोतक्त आठ शहरांमध्ये Airtel 5G चा वापर करता येईल. हे देखील वाचा: अँड्रॉइडच्या बादशाहचं भारतात आगमन! शानदार कॅमेऱ्यासह Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro लाँच

सुपरफास्ट स्पीडनं होईल काम

भारती एयरटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ गोपाल विट्टल यांनी Airtel 5G Plus च्या लाँचिंग दरम्यान माहिती दिली की एयरटेल 5जी प्लस आगामी काळात लोकांसाठी संवाद, काम, कनेक्शन आणि खेळण्याची व्याख्या बदलण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. युजर्स एयरटेल 5जी प्लसवरून हाय-डेफिनिशन व्हिडीओ स्ट्रीमिंग, गेमिंग, मल्टीपल चॅटिंग, फोटोज अपलोड करण्यासारख काम सुपरफास्ट स्पीडनं करू शकतील.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here