आली मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार Grand Vitara लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये

मारुती सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची प्रतीक्षा अखेर संपली आली आहे. Maruti Suzuki Grand Vitara हायब्रीड कार भारतात सादर झाली आहे. मारुतीची ही मिड साईज SUV ची मार्केटमध्ये थेट टक्कर Kia Seltos, Hyundai Creta, Tata Harrier, आणि MG Astor सारख्या कारशी असेल. Maruti Suzuki Grand Vitara ला सर्वात जास्त आव्हान Toyota Urban Cruiser Hyryder कडून मिळेल जी एक सारख्या प्लॅटफॉर्मवर बनली आहे. पुढे आम्ही तुम्हाला मारुतीच्या ग्रँड विटारा हायब्रीड कारबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

Maruti Suzuki Grand Vitara स्लिप्ट हेडलॅम्प डिजाइनसह सादर करण्यात आली आहे. तसेच या कारमध्ये नवीन ग्रिल क्रोम देण्यात आले आहेत ज्यामुळे कारला शानदार लुक मिळतो. तसेच ग्रँड विटारामध्ये नवीन ड्युअल टोन अलॉय व्हील, बॉडी कलर ORVM, ब्लॅक रूफ, वार्पराउंड LED टेल लाईट, बूट मध्ये टू पीस LED लाईट बार देण्यात आले आहेत. हे देखील वाचा: 146km ची दमदार रेंज असलेली Ather 450X Gen 3 लाँच, जाणून घ्या इलेक्ट्रिक स्कूटरचे शानदार फीचर्स

Maruti Suzuki Grand Vitara चे फीचर्स

Maruti च्या हायब्रीड Grand Vitara मध्ये पॅनोरॉमिक सनरूफ, 9 इंच फ्रीस्टेंडिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा आणि Head-Up डिस्प्ले (HUD) देण्यात आला आहे. या फोनमध्ये फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट कलस्टर देण्यात आला आहे. मारुतीची ही कार डिजिटल इंट्रूमेंट कलस्टरसह येणारी पहिली कार आहे.

Maruti Suzuki Grand Vitara मध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिनसह माइल्ड हायब्रीड आणि स्ट्रॉन्ग हायब्रीड सिस्टम देण्यात आली आहे. या कारमध्ये ट्रांसमिशनसाठी 5 स्पीड मॅन्युअल यूनिट, 6 स्पीड मॅन्युअल यूनिट आणि e-CVT यूनिट देण्यात आलं आहे. या मॉडेलमध्ये AllGrip सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Electric Car सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी येतेय Xiaomi; स्वस्तात मिळणार ‘ऑटोमॅटिक’ चालणारी कार

Maruti Suzuki Grand Vitara वेरिएंट्स

इंजिन 1.5-litre, 4-सिलेंडर पेट्रोल माइल्ड हायब्रिड (मारुति इंजिन)
1.5-लीटर, 3-सिलेंडर पेट्रोल स्ट्रॉंग-हायब्रिड (टोयोटा पावरट्रेन)
पावर 103PS 116PS (combined)
टॉर्क 137Nm 122Nm (engine) 141Nm (motor)
ट्रांसमिशन 5-speed MT, 6-speed AT e-CVT
ड्राइवट्रेन FWD, AWD (MT only) FWD
मायलेज 21.11kmpl (MT), 20.58kmpl (AT), 19.38kmpl (AWD MT) 27.97kmpl

 

मारुती Grand Vitara चे सहा व्हेरिएंट लाँच केले जातील. मारुतीची ही हायब्रीड कार दोन इंजिनसह सादर करण्यात आली आहे, ज्यात एक मारुतीचा 1.5-लीटर K-Series इंजिन आहे आणि दुसऱ्यामध्ये टोयोटाचा 3 सिलेंडर देण्यात आला आहे. तसेच ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल व्हेरिएंट वेगवेगळ्या सहा व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here