146km ची दमदार रेंज असलेली Ather 450X Gen 3 लाँच, जाणून घ्या इलेक्ट्रिक स्कूटरचे शानदार फीचर्स

इंडियन इलेक्ट्रिक व्हेईकल ब्रँड Ather Energy नं आपली नवीन बॅटरी असलेली स्कूटर भारतीय ऑटो बाजारात लाँच केली आहे. ही एक नवीन जनरेशनची electric scooter आहे, जी Ather 450X Gen 3 नावानं बाजारात आली आहे. तसेच या electric scooter मध्ये आधीच्या मॉडेल्स पेक्षा जास्त रेंज देण्यासाठी कंपनीनं 25 टक्के मोठ्या बॅटरीचा वापर केला आहे. या लेखात आम्ही तुमच्या Ather 450X Gen 3 च्या Price, Range आणि Specification ची संपूर्ण माहिती दिली आहे.

Ather 450X Gen 3 price in India

नवीन पिढीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी असेल. परंतु हिची किंमत कंपनीच्या होम स्टेटमध्ये 1,55,657 रुपये (एक्स-शोरूम, बेंगळुरू) आहे. अहमदाबादमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर सर्वात स्वस्त आहे, जिथे हिची किंमत 1,37,612 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Ather 450X Gen 3 Sale

एथर 450X जेन 3 ची विक्री बुधवारी 20 जुलैपासून मुंबई, पुणे, दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद, जयपुर, कोच्चि आणि बेंगळुरूमध्ये कंपनीच्या शोरूममध्ये उपलब्ध होईल. चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती. हे देखील वाचा: Electric Car सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी येतेय Xiaomi; स्वस्तात मिळणार ‘ऑटोमॅटिक’ चालणारी कार

Ather 450X Gen 3 features

नवीन एथर 450X जेन 3 मध्ये एक अपग्रेडेड 3.7kWh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्याबाबत कंपनीनं दावा केला आहे की, ही जुन्या मॉडेलमध्ये असलेल्या बॅटरीपेक्षा 25% मोठी आहे. तसेच ही एआरएआय प्रमाणननुसार 146 किमीची कमाल रायडींग रेंज आणि एथर कंपनीच्या डेटानुसार 105 किमीची रेंज देईल. या स्कूटरमध्ये आता Warp, Sport, Ride, SmartEco, आणि Eco असे पाच राईड मोड्स देण्यात आले आहेत.

स्कूटरमध्ये एक ऑल-अ‍ॅल्युमिनियम फ्रेम, जुन्या मॉडेलच्या तुलनेत 22% अतिरिक्त ग्रिपसाठी मोठा प्रोफाईल रियर टायर, आणि एका नव्या टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमचा समावेश करण्यात आला आहे जो स्कूटरच्या स्मार्ट डिस्प्ले डॅशबोर्डमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. डिस्प्लेचा आकार 7 इंच करण्यात आला आहे, यात अतिरिक्त रॅम (आता 2GB पर्यंत) मिळतो. हे देखील वाचा: 1,000 KM रेंज, सोलर चार्जिंगसह येणारी ‘ही’ बॅटरी कार आहे अनोखी, जाणून घ्या थक्क करणारे फीचर्स

एका विधानात, एथरनं म्हटलं आहे की, उच्च तापमानात व्यवस्थित पद्धतीनं काम करण्यासाठी हाय रॅम सिस्टम देण्यात आली आहे जी भारतातिल प्रवासातही आवश्यक आहे. तसेच यात असं देखील सांगण्यात आलं आहे की नवीन डॅशबोर्ड “मेमरी-इंटेन्सिव्हह अ‍ॅप्लिकेशनचे प्रदर्शन वाढवेल आणि भविष्यात व्हॉइस कमांड, मल्टी-लँग्वेज सपोर्ट, हेव्ही ग्राफिक्स आणि डीप डायग्नोस्टिक्स सारख्या सुविधा देण्यात येतील.” स्कूटरमध्ये एक नवीन डिजाइन करण्यात आलेला रियरव्यू मिरर देखील आहे जो मेनफ्रेममध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच कंपनीचा दावा आहे की यामुळे दुप्पट चांगली दृश्यमानता मिळेल. यात एक नवीन स्टॅन्ड डिजाइन देखील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here