Xiaomi Redmi K20 Pro येत आहे भारतात, OnePlus 7 Pro ला देईल थेट टक्कर

Xiaomi ने गेल्या आठवड्यात अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करत रेडमी के सीरीज सादर केली होती. या सीरीज अंतर्गत कंपनीने Redmi K20 आणि Redmi K20 Pro स्मार्टफोन सादर केले होते. पॉप-अप कॅमेरा, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट आणि अशाच दमदार स्पेसिफिकेशन्स सह हि स्मार्टफोन सीरीज चीनी बाजारात लॉन्च केली गेली आहे. Redmi K20 Pro ची पावर पाहता भारतात पण शाओमी फॅन आणि स्मार्टफोन फॅन याच सीरीजची वाट बघत आहेत. आता त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. Xiaomi India लवकरच भारतात Redmi K20 सीरीजचे स्मार्टफोन लॉन्च करू शकते.

शाओमी इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी आज आपल्या ट्वीटर हँडल द्वारे Redmi K20 सीरीजच्या इंडिया लॉन्चची घोषणा केली आहे. मनु जैन यांनी सांगितले कि Xiaomi भारतात रेडमी के सीरीजचे दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोन Redmi K20 आणि Redmi K20 Pro आणणार आहे. या ट्वीट मध्ये मनु जैन यांनी Redmi K सीरीजच्या इंडिया लॉन्चची घोषणा करत काही बिलबोर्ड जाहिरातीचे फोटो पण शेयर केले आहेत, ज्यात Redmi K20 मॉडेल्स थेट OnePlus 7 Pro चे प्रतिस्पर्धी असल्याचे दाखवण्यात आले आहे.

Redmi K20 आणि Redmi K20 Pro सोबत शाओमी इंडिया हेड ने #FlagshipKiller 2.0 हॅशटॅग वापरत हे फ्लॅगशिप कीलर अपडेटेड वर्जन 2.0 असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे OnePlus स्मार्टफोन्स फ्लॅगशिप कीलर नावाने ओळखले जातात. मनु जैन यांनी आपल्या ट्वीट मध्ये Redmi K ला OnePlus पेक्षा चांगले असल्याचे सांगितले आहे. Xiaomi India ने अजूनतरी Redmi K20 मॉडेलच्या लॉन्च डेटचा खुलासा केला नाही पण आशा आहे लवकरच कंपनी लॉन्चची तारीख पण सार्वजनिक करेल.

Redmi K20 Pro
हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.39-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शन साठी कंपनीने हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला आहे. Redmi K20 Pro शाओमी द्वारा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज करण्यात आला आहे जो 7व्या जेनरेशन टेक्नॉलॉजी वर बनला आहे. कंपनीने Redmi K20 Pro एंडरॉयड 9 पाई सह मीयूआई10 वर सादर केला आहे.

Redmi K20 Pro मध्ये प्रोसेसिंग साठी 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 देण्यात आला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह चालतो . तसेच ग्राफिक्स साठी हा फोन एड्रेनो 640 जीपीयू ला सपोर्ट करतो. Xiaomi ने रेडमी के सीरीजचा हा फोन गेमिंग यूजर्सना लक्षात घेऊन बनवला आहे. या मध्ये गेम टर्बो 2.0 मोड देण्यात आला आहे जो खूप स्मूथ आणि लॅग फ्री गेमिंग परफॉर्मेंस देतो .

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi K20 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.4 अर्पचर वाला 13-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि त्याच अपर्चर वाली 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी बद्दल बोलायचे तर रेडमी के20 प्रो एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi K20 Pro 4जी फोन आहे जो डुअल सिमला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ, एनएफसी व यूएसबी टाईप-सी पोर्ट सह 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 27वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi K20
Redmi K20 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात कंपनीने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 730 प्रोसेसर दिला आहे. चिपसेट व्यतिरिक्त Redmi K20 आणि Redmi K20 Pro ची डिजाइन आणि इतर स्पेसिफिकेशन्स जवळपास एकसारखे आहेत. याचा अर्थ असा कि तुम्हाला फ्लॅगशिप Redmi K20 Pro प्रमाणेच Redmi K20 मध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, एंडरॉयड 9 पाई आणि पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी दिली आहे जी फास्ट चार्जिंग 18W ला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here